शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

Teachers Day -शिक्षकांमुळेच ‘आयपीएस’ झालो : डॉ. अभिनव देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2019 2:23 PM

शिक्षणाची अभिरुची वाढल्याने इंडियन पोलीस सर्व्हिस (आयपीएस)मध्ये मी पोलीस अधीक्षक झालो....’ हा अनुभव सांगताना पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त करीत होते.

ठळक मुद्देसहायक आयुक्त ते पोलीस अधीक्षक प्रवास डॉ. अभिनव देशमुख यांच्या आयुष्याला आकार देणारे शिक्षक

एकनाथ पाटीलकोल्हापूर :  शिक्षणाची अभिरुची वाढल्याने इंडियन पोलीस सर्व्हिस (आयपीएस)मध्ये मी पोलीस अधीक्षक झालो....’ हा अनुभव सांगताना पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त करीत होते.

‘वडील शासकीय नोकरीत असल्याने परभणी, उस्मानाबाद, सोलापूर, लातूर, आदी वेगवेगळ्या शाळांमधून माझे शिक्षण झाले. हुशार असल्याने लातूरच्या केशवराज विद्यालयाचे गुरुजी धोंडीराम नामदेवराव चाफेकर, कै. शंकरराव मोरे, प्रफुल्ल कुलकर्णी, अनिरुद्ध जाधव, डी. वाय. मुळे, अतुल लांडे, विवेक कुलकर्णी, जगन्नाथ दीक्षित, आदी शिक्षकांनी शालेय जीवनापासूनच स्पर्धा परीक्षांचे वेड मला लावले. त्यामुळे प्रत्येक परीक्षेत मी गुणवत्तेनुसार पहिला येत गेलो. शालेय, महाविद्यालयीन आणि स्पर्धा परीक्षांमध्ये शिक्षकांचा प्रभाव माझ्यावर पडल्याने मी एम. बी. बी. एस. पदवीनंतर लोकसेवा आयोगातर्फे परीक्षा दिली आणि गुजरात येथील भारतीय सीमा शुल्क विभागाच्या सहायक आयुक्तपदी नियुक्त झालो. दोन वर्षे या ठिकाणी नोकरी केली.वडील महसूल विभागात उपजिल्हाधिकारी होते. गाव पोहनेर (जि. उस्मानाबाद) असले तरी त्यांच्या नोकरीमुळे आम्ही संपूर्ण महाराष्ट्र फिरत होतो. परभणी, उस्मानाबाद, सोलापूर, लातूर, आदी ठिकाणी माझे शिक्षण झाले. लातूरच्या केशवराज विद्यालयात शिकत असताना धोंडीराम चाफेकर गुरुजी मराठी शिकवीत होते. ते माझे वर्गशिक्षक होते.

पांढरेशुभ्र धोतर, डोक्यावर गांधी टोपी, सोबत नेहमी सायकल असा त्यांचा रुबाबदार पेहराव. त्यांच्याकडे पाहून मला भारतीय कपड्यांमध्ये आपण चांगले दिसू शकतो, याची जाणीव झाली. त्यामुळे लहानपणापासून स्वच्छ कपडे घालण्याची सवय मला लागली. ते धरणे, कारखाने कसे उभे राहिले याची माहिती देण्यासाठी ते स्वत: आम्हाला घेऊन जात असत. त्यांचा प्रभाव माझ्यावर पडला. कै. शंकरराव मोरे हे इतिहास शिकवीत होते. त्यांच्या अंगातच नाट्यकला असल्याने ते शिकवीत असताना इतिहास उभा करीत असत.

राजर्षी शाहू महाविद्यालयात अकरावी-बारावीचे कॉलेज शिक्षण झाले. तेथील शिक्षक अनिरुद्ध जाधव यांचा दरारा मोठा होता. लातूर पॅटर्नचे प्रणेते म्हणून त्यांची ओळख आहे. ते समोरून आल्याचे पाहताच आम्ही पाठीमागील जिन्यातून पळून जात होतो.

ते अगदी शिस्तबद्ध व कडक स्वभावाचे होते. त्यांना बाहेरून खासगी क्लासेस, शिक्षण संस्थांच्या आॅफर येत होत्या; परंतु त्यांनी पैसा कमाविण्याऐवजी संस्थेशी एकनिष्ठ राहून ती नावारूपास आणली. संस्थेतील एकाही शिक्षकाला स्वत:चा वैयक्तिक क्लास घेऊ दिला नाही. त्यांच्याकडून मी शिस्तीचे धडे शिकलो. औरंगाबाद येथे वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेतला. एम. बी. बी. एस. ही पदवी घेतली. येथील शिक्षक डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्याकडून पुस्तकी ज्ञानाबरोबरच समाजातील घडामोडींच्या ज्ञानाचा खजिना आत्मसात करता आला. डॉ. डी. वाय. मुळे यांनी आजारी असताना खूप चांगले शिकविले.शालेय जीवनातच दक्षिण भारताची सहल केली. अनेक ठिकाणी भेटी दिल्याने खूप मोठा अनुभव घेता आला. कवी कुसुमाग्रज यांना भेटायची संधी मिळाली. प्रफुल्ल कुलकर्णी हे तसे राजकीय शिक्षक. ते शाळेत कमी आणि बाहेर जास्त असत. त्यामुळे आम्ही त्यांना ‘राजकीय शिक्षक’ या नावाने ओळखत होतो. ते मराठी शिकवीत होते. त्यांनी शिकविलेली कोलंबस गर्वगीत कविता आयुष्यात कधीच विसरलो नाही. कुसुमाग्रज यांच्या ‘कणा’ या कवितेतून त्यांनी आम्हाला जीवन शिकविले. शिक्षकांमुळेच मी ‘आयपीएस’ झालो.रेक्टरला ठेवले कोंडूनऔरंगाबाद येथे वैद्यकीय शिक्षण घेत असताना शासकीय वसतिगृहामध्ये आम्ही राहत होतो. पदवी घेऊन बाहेर पडलेले विद्यार्थी याठिकाणी अनेक महिने राहत असल्याने रोज दंगामस्ती असायची. रात्रीच्या वेळी वीज बंद करून गोंधळ घालायचा. अशावेळी येथील रेक्टर नंदरुकर सर हे आम्हाला ओरडायचे. एके दिवशी आम्ही त्यांना अंधारात कोंडून घातले; परंतु ते आम्हाला काही बोलले नाहीत. त्यांचा स्वभाव मजेशीर होता.शिक्षणाची शिदोरी सार्थ ठरलीवडील महसूल विभागात वरिष्ठ अधिकारी असल्याने त्यांच्यासोबत विविध शासकीय कार्यालयांत जात होतो. त्यांच्यासोबत फिरताना त्यांचे वरिष्ठ बॉस कोण? याची मला उत्सुकता लागून राहत होती. मोठे झाल्यावर आपणही असेच अधिकारी बनायचे, अशी जिद्द मनात ठेवली होती. लहानपणापासून शिक्षकांनी दिलेली शिक्षणाची शिदोरी ही मला अधिकारी बनण्यासाठी सार्थ ठरली. 

 

टॅग्स :Teachers Dayशिक्षक दिनkolhapurकोल्हापूरEducation Sectorशिक्षण क्षेत्रPoliceपोलिस