सोळांकूर : समाजाला चांगल्या दिशेने प्रेरित करून ज्ञान, सुसंस्कार व गुणवंत विद्यार्थी घडविण्याऱ्या शिक्षकांना पुरस्कारांनी सन्मानित करून शाबासकीची थाप देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी केले.
सोळांकूर (ता. राधानगरी) येथे राधानगरी तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी पंचायत समिती सभापती सोनाली पाटील उपस्थित होत्या.
पाटील म्हणाले, तालुक्याच्या शिष्यवृती पॅटर्नचा राज्यात लौकिक आहे. अनेक विद्यार्थी आज उच्चपदावर कार्यरत आहेत. शाळेचे रूप पालटले आहे.
स्वागत संजय जांगनुरे यांनी केले. यावेळी आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त वि. म., फराळेचे अध्यापक सुरेश सुतार, वि. म., पात्रेवाडीचे आनंदराव नाळे व वि. म., तुरंबेचे बळवंत पोवार यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सरपंच आर. वाय. पाटील, राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष शिवाजी पाटील, मसू पाटील, संजय पाटील, बाबूराव पाटील, युवराज पाटील, मधुकर मुसळे, प्रकाश कानकेकर, रघुनाथ धनवडे, संतोष भोसले, आनंदा सुतार, संजय जांगनुरे, दिलीप पाटील, संजय पाटील, सतीश धावरे, सचिन कुदळे, वाय. एस. पाटील यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.