शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
2
Vinod Tawde विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, विरारमध्ये मोठा राडा; भाजपा म्हणते, ही तर स्टंटबाजी
3
Vinod Tawde News "मला भाजपवाल्यांनीच सांगितले की ते..."; विनोद तावडेंनी पैसे वाटल्याच्या आरोपांवर ठाकुरांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
5
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
6
स्पेस स्टेशनमध्ये सुनीता विल्यम्सची तब्येत बिघडली, वजन कमी होत आहे? स्वत: दिली माहिती
7
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या हंगामादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी, पटापट चेक करा आजचे नवे दर
8
उत्तर प्रदेशमधील पोटनिवडणुकीत या जागांवर एनडीए तर या मतदारसंघात इंडियाचं पारडं जड
9
मतदारांना लागणार चंदनाचा टिळा अन् मिळणार तुळशीचे रोप; पनवेल ठरणार लोकशाहीच्या उत्सवाचे मॉडेल
10
"महाविकास आघाडीचा खोटं बोलून सत्तेत यायचा प्रयत्न"; धनंजय मुंडेंचं टीकास्त्र
11
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
12
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
13
Naga chaitanya-Sobhita wedding: शोभिता नेसणार कांजीवरम साडी पण...; काय आहे खास?
14
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
15
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
16
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
17
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
18
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
19
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
20
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!

शिक्षकांचे समायोजन सप्टेंबर २०१४ नुसार करा

By admin | Published: November 17, 2014 12:18 AM

शिक्षक संघटना : पडताळणी करून निर्देश देण्याची शिक्षक संचालकांची ग्वाही

कोल्हापूर : राज्यातील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन २०१३ पासून रखडले आहे. सप्टेंबर २०१४ च्या शिक्षक निश्चितीनुसार अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करावे, अशी मागणी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्राथमिक शिक्षण संचालक महावीर माने यांची भेट घेऊन केली.मागणीसंबंधी सकारात्मक चर्चा झाली. लवकरच प्रशासकीय बाबींची पडताळणी करून योग्य ते निर्देश प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना देण्यात येईल, असे आश्वासन श्री. माने यांनी शिष्टमंडळाला दिल्याची माहिती संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिली. पत्रकात म्हटले आहे, दरवर्षी सप्टेंबर महिन्यात विद्यार्थी संख्येच्याआधारे शिक्षक संचनिश्चिती करून आॅक्टोबरअखेर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन, बदल्या करण्याबाबतचे शासननिर्देश आहेत पण सन २०१३ मध्ये प्रथमच शिक्षणाचा हक्क कायद्याच्या निकषांनुसार शिक्षक निश्चिती झाल्यामुळे समायोजन प्रक्रियेस विलंब झाला आहे. दरम्यान, आचारसंहिता व न्यायालयीन स्थगिती आदी कारणांमुळे सप्टेंबर २०१३ चे शिक्षक समायोजन काही जिल्ह्णांत अद्याप झालेले नाही. त्यामुळे संघटनेचे राज्याध्यक्ष पाटील यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या शिष्टमंडळाने पुणे येथे श्री. माने यांची भेट घेऊन चर्चा केली. सप्टेंबर २०१३ चा विद्यार्थीपट व सप्टेंबर २०१४ चा विद्यार्थीपट भिन्न आहे. त्यामुळे सप्टेंबर २०१३ च्या शिक्षक शिक्षक निश्चितीवर २०१४ रोजी अतिरिक्त शिक्षकांच्या समाजयोजन बदल्या केल्यास आज रोजी नको असलेल्या ठिकाणी शिक्षक दिला जाणार आहे. आवश्यक त्या ठिकाणी शिक्षक मिळणार नाही. समायोजनेस पात्र असलेले शिक्षक अद्याप जुन्याच शाळेत आहेत. त्यामुळे सप्टेंबर २०१४ च्या पटानुसार करण्यात येणारी शिक्षक संचनिश्चिती मागील वर्षी समायोजन होऊ न शकलेल्या शिक्षकांसह करणे सोईस्कर होईल,अशी श्री. माने यांच्याशी चर्चा झाली. शिष्टमंडळात प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष पाटील, सतीश बजाईत, विजय भोगेकर,भागवत पाटील, बालाजी पांडागळे आदी उपस्थित होते.