कबनूर : शेतकऱ्यांना विविध योजनेच्या थेट लाभासाठी ‘ई-पीक ॲप’ माहिती संकलित करेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे ‘ई पीक ॲप’चा उपयोग करावा, असे प्रतिपादन अप्पर तहसीलदार शरद पाटील यांनी केले. येथील वाकरेकर मळ्यामधील शेतामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
महाराष्ट्र शासनाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम ई-पीक पाहणी उपक्रमास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. याअंतर्गत शेतकरी सहजरित्या मोबाईलवरून आपले पीक ७/१२ वर नोंद करू शकणार आहेत. ई-पीक प्रणालीचा वापर सुलभ व्हावा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळावा, याकरिता तलाठी एस. डी. पाटील, मंडल अधिकारी जे. आर. गोन्साल्विस हे कबनूरमधील शेतकऱ्यांना प्रशिक्षित करत आहेत. शेतकऱ्यांचा समूह निर्माण करून त्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. यावेळी अप्पर तहसीलदार शरद पाटील यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना भेट देऊन मार्गदर्शन केले.
यावेळी अजित खुडे, बबन केटकाळे, सचिन वाकरेकर, राजू कोले, चंद्रकांत वाकरेकर, इकबाल सनदी, दीपक वाकरेकर, धनाजी निंबाळकर, महादेव वाकरेकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
फोटो ओळी
०५०९२०२१-आयसीएच-०१
कबनूर : येथील वाकरेकर मळामध्ये थेट शिवारात जाऊन अप्पर तहसीलदार शरद पाटील यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.