शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

नृत्याविष्काराचा ‘तेजोमय तेजोनिधी’

By admin | Published: January 29, 2017 12:31 AM

कार्याविषयी उलट-सुलट प्रश्न यांची उत्तरे देणारे संवादात्मक निवेदन प्रेक्षकांच्या मनातील शंका दूर करणारे ठरले.

कोल्हापूर : ‘जगन्नाथाचा रथ..’, ‘ शतजन्म शोधिताना..’, ‘ हे हिंदू नृसिंहा प्रभो...’, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अलौकिक काव्यप्रतिभेचे दर्शन घडविणाऱ्या रचनांचे भरतनाट्यम् नृत्याविष्कार सादरीकरणाने शनिवारी ‘तेजोमय तेजोनिधी’ कार्यक्रम रंगला. परावलंबी जीवन जगणाऱ्या व्यक्तींची सेवा वाहणाऱ्या सावली केअर सेंटरच्या इमारत निधीसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक (मुंबई), कलांगण (मुंबई) व नृत्यश्री (मिरज) या संस्थांतर्फे केशवराव भोसले नाट्यगृहात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या गीतांवर आधारित नृत्यमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची संकल्पना फिअरलेस फ्लायर्स फौंडेशनची होती. यावेळी ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या ‘भाव सरगम’ या कार्यक्रमाला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे उपस्थित होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कवितांनी नेहमीच गायक, संगीतकारांना भुरळ घातली आहे; पण याच कलाकृती जेव्हा भरतनाट्यम् नृत्यप्रकारातून सादर केल्या जातात तेव्हा एक देखणा कार्यक्रम उभा राहतो आणि सावरकरांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची नव्याने ओळख होते, याचा प्रत्यय रसिकांना आला. सावरकरांच्या प्रचलित आणि अप्रचलित गीतांना वर्षा यांनी स्वरसाज चढविला होता. त्यावर नृत्यांगना धनश्री आपटे आणि त्यांच्या शिष्यांनी अभिनव पद्धतीने नृत्याविष्कार सादर केले. अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी सावरकरांविषयी जनमानसांत असलेले अज्ञान, त्यांच्या कार्याविषयी उलट-सुलट प्रश्न यांची उत्तरे देणारे संवादात्मक निवेदन प्रेक्षकांच्या मनातील शंका दूर करणारे ठरले. दरम्यान, कार्यक्रमातून मिळालेल्या पाच लाखांचा धनादेश पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते ‘सावली’चे डॉ. किशोर व गौरी देशपांडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. डॉ. देशपांडे यांनी ‘सावली’च्या नव्या इमारतीविषयी माहिती दिली. ते म्हणाले, फिजिओथेरपी जीम, देशातील पहिला वॉटर थेरपी पूल, शवागार, मल्टिपर्पज हॉल अशी इमारत असणार आहे. मदत : दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानकडूनहीसमाजासाठी झटणाऱ्या अनेक संस्थांना दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानतर्फे एक लाखांची मदत देण्यात येते.यंदा ही मदत सावली केअर सेंटरला देण्याची घोषणा पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी केली.ही मदत दि २४ एप्रिलला सावली संस्थेकडे देण्यात येणार आहे.