शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha: आतापर्यंत कोणत्या पक्षाचा स्ट्राइक रेट राहिला सर्वाधिक?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कामात यशस्वी व्हाल, आर्थिक लाभ होण्याची शक्यता!
3
निवडणुकीत डिपॉझिट वाचवण्यासाठी उमेदवारांना किती मतांची गरज असते?; जाणून घ्या सविस्तर
4
IND vs AUS : बुमराहच्या नेतृत्वाखाली या दोन नव्या चेहऱ्यांना मिळाली पदार्पणाची संधी
5
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘एक्झिट पोल’ इतके गोंधळलेले का आहेत?
6
‘ती’ वादग्रस्त विधाने आयोगाच्या रडारवर; केंद्रीय मुख्य आयुक्तांनी मागवले अहवाल
7
सत्ता आमचीच! सत्ताधारी महायुती आणि विरोधी मविआच्या नेत्यांचे दावे 
8
करवीर ते कुलाबा 40 टक्के मतांचे अंतर; असे का ते समजून घ्या!
9
टक्क्याचा धक्का कुणाला? निवडणुकीत मतदारांमध्ये सुप्त लाट
10
बीड जिल्ह्यात मतदान केंद्र फोडले; ४० जणांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल
11
Maharashtra Vidhan Sabha ELection 2024: मुंबईत कोणत्या शिवसेनेसाठी मतटक्का वाढला?
12
विशेष लेख: कट्टर उजवे आणि वादग्रस्त - ऑल द प्रेसिडेंट्स मेन....
13
अदानींवर अमेरिकेत लाचप्रकरणी खटला; आरोप निराधार, आम्ही निर्दोष : अदानी
14
सत्ता स्थापनेच्या संभाव्य शक्यतांवर खलबते सुरू; निवडून येऊ शकणाऱ्या अपक्षांबाबतही चर्चा
15
स्ट्राँग रूमवर तिसऱ्या डोळ्याचे लक्ष; मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमध्ये मतदानयंत्रे कडेकोट बंदोबस्तात
16
शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना: जयदेव आपटेंच्या याचिकेवरील सुनावणी तहकूब
17
बारावी ११ फेब्रुवारी, दहावी परीक्षा २१ फेब्रुवारीपासून; व्हायरल वेळापत्रकावर विश्वास न ठेवण्याचे बोर्डाचे आवाहन
18
यूजीसी नेट परीक्षा जानेवारीत होणार; १० डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येणार
19
Exit Poll: दोन्ही NCP तुल्यबल; एकनाथ शिंदेच ठरणार वरचढ, उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार?
20
१०७ जागांसह भाजपा सर्वांत मोठा पक्ष, महाविकास आघाडीला १०२ जागा; नवीन Exit Pollचा अंदाज

सात हजार कोटींमध्ये किती आरोग्य सुविधा दिल्या ते सांगा; समरजित घाटगेंचा मुश्रीफांवर टीकेचा भडिमार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2024 1:31 PM

साके : पालकमंत्री सात हजार कोटींचा निधी आणला म्हणतात, मग या निधीतून त्यांनी तालुक्यातील जनतेच्या आरोग्यासाठी किती आरोग्य केंद्रे, ...

साके : पालकमंत्री सात हजार कोटींचा निधी आणला म्हणतात, मग या निधीतून त्यांनी तालुक्यातील जनतेच्या आरोग्यासाठी किती आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे मंजूर करून आणली, पीसी सेंटरमध्ये किती आधुनिक सुविधा दिल्या ते जाहीर करावे. ग्रामीण जनतेला किरकोळ उपचारांसाठीदेखील तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते हाच पालकमंत्र्यांचा विकास म्हणायचा का, असा सवाल समरजित घाटगे यांनी मंगळवारी उपस्थित केला.सावर्डे खुर्द (ता. कागल) येथे महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. ते म्हणाले, गेल्या पंचवीस वर्षांत पालकमंत्र्यांनी मतदारसंघात एकही नवीन उद्योग-व्यवसाय न आणल्याने बेरोजगारी वाढली आहे. भूमिपुत्रांना रोजीरोटीसाठी बाहेरगावी जावे लागते ही शाहूंच्या भूमीची शोकांतिका आहे. टिमकी वाजवत असलेल्या विकासकामांच्या पुस्तकातून मतदारसंघात वाढलेल्या बेकारीची आकडेवारी पालकमंत्र्यांनी जाहीर करावी. आपला लोकसेवक म्हणून काम करण्याची आम्हाला संधी द्या आपल्याला आरोग्याच्या मूलभूत सुख-सुविधा उपलब्ध करून देऊ.

तालुकाध्यक्ष शिवानंद माळी म्हणाले, शरद पवार यांनी पंचवीस वर्षे कागलच्या गैबी चौकात ज्यांच्यासाठी जाहीर प्रचारसभा घेऊन आमदार, मंत्री केले त्यांचाच पालकमंत्र्यांनी विश्वासघात केला आहे. आनंदा डाफळे, आकाश पाटोळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शाहू कारखान्याचे संचालक डी.एस. पाटील, प्रताप पाटील, दिगंबर आस्वले, एल.डी. पाटील, चंद्रकांत दंडवते, ज्योतीराम मालवेकर, बचाराम पसारे, यशवंत मालवेकर, शिवाजी विष्णू डाफळे, भिकाजी कदम, बाळासो लिंगडे यांच्यासह कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी उपसरपंच हिंदुराव मालवेकर यांनी प्रास्ताविक केले. गणेश मालवेकर यांनी आभार मानले.

कंत्राटदारांचा विकास हाच अजेंडामाजी उपसरपंच हिंदुराव मालवेकर म्हणाले, २५ वर्षे सत्तेत असलेल्या पालकमंत्र्यांनी परिसरात कोणत्याही मूलभूत सुविधा दिल्या नाहीत. कंत्राटदारांचा विकास म्हणजे जनतेचा विकास हाच त्यांचा अजेंडा राहिला आहे. त्यामुळे जनता आता सावध झाली असून, त्यांना निवडून देण्याची चूक पुन्हा करणार नाही.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kagal-acकागलSamarjitsinh Ghatgeसमरजितसिंह घाटगेHasan Mushrifहसन मुश्रीफwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024