लोकमत न्यूज नेटवर्क --कोल्हापूर : कोल्हापुरातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी संघर्ष समिती आणि श्रीपूजक यांना सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी केले. या दोन्हीही समित्यांच्या सदस्यांची स्वतंत्र बैठक गुरुवारी पोलीस मुख्यालयात घेण्यात आली. त्याप्रसंगी त्यांनी हे आवाहन केले. दरम्यान, दोन्ही बैठकीत सदस्यांनी या प्रकरणास ब्राह्मण-ब्राह्मणेतर असा रंग न देण्याचे आवाहन केले. सोशल मीडियामार्फत समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची ग्वाही नांगरे-पाटील यांनी यावेळी दिली.या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक संजय मोहिते, शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, निशिकांत भुजबळ, शशिकांत पाटोळे, आदी अधिकारी उपस्थित होते.प्रथम श्री अंबाबाई मंदिर पुजारी हटाव संघर्ष समितीच्या सदस्यांची बैठक घेण्यात आली. यामध्ये शहरात निर्माण झालेल्या कायदा व सुव्यवस्थेबाबतची माहिती घेण्यात आली. भविष्यात या प्रश्नाने भीषण स्वरूप धारण करू नये, म्हणून येणाऱ्या परिस्थितीला संयमाने सामोरे जावे, असे आवाहन समितीच्या सदस्यांना विशेष पोलीस महानिरीक्षक नांगरे-पाटील यांनी यावेळी केले. त्याबाबत त्यांनी सदस्यांना सूचना केल्या. या बैठकीत (पान ६ वर)सोशल मीडिया सेलची मदत घेणारअंबाबाई मंदिरातील वादाबाबत सोशल मीडियावरून समाजात तेढ निर्माण करण्याचा काहीजण प्रयत्न करीत आहेत. काहीजण समाजातील वाद भडकविणाऱ्या क्लिप मोबाईलवर टाकत आहेत. असे संदेश पाठविणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. यासाठी मुंबईतील सोशल मीडियाच्या सेलची मदत घेण्यात येणार आहे. काहींना धमकीची पत्रे आली आहेत; त्याबाबत तपास सुरू असून, त्याला शोधून त्याच्यावर कारवाई करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
मंदिर वादास ब्राह्मण-ब्राह्मणेतर रंग नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2017 1:07 AM