कोल्हापूर : गोवा बनावटीचे विदेशी मद्याची चोरटी वाहतूक करणारा मिनी टेम्पो आजरा ते मडिलगे मार्गावर सुलगाव (ता. आजरा) हद्दीत गुरुवारी सकाळी पकडला. कारवाईत आजरा पोलिसांनी सुमारे दीड लाखांचा मद्यसाठा व तीन लाख रुपये किमतीचा टेम्पो असा सुमारे ४ लाख ४८ हजार ९५२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला तर तिघांना अटक केली.इस्माईल इनूस मणियार (वय २०, रा. साबळेश्वर, ता. मोहळ, जि. सोलापूर), उमाकांत दशरथ कारंडे (२५, रा. मु. रानमसले, पो. नानाज, ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर), इसाक पठाण (रा. सावळेश्वर, ता. मोहोळ, जि. सोलापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.गोव्यातून आजरामार्गे विदेशी मद्याचे बॉक्स भरून महाराष्ट्रात विक्रीच्या उद्देशाने चोरटी वाहतूक करणारा टेम्पो येत असताना पोलिसांनी सुलगाव गावच्या हद्दीत हा टेम्पो पकडला. या टेम्पोमध्ये व्हिस्कीच्या ४१ बॉक्समध्ये १९६८ बाटल्या तर रमच्या दहा बॉक्समध्ये ४८० बाटल्या होत्या. या मद्याची एकूण किमत एक लाख ४८ हजार ५१२ रुपये इतकी होते. मद्यासह टेम्पोही पोलिसांनी जप्त केला. पुढील तपास आजरा पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल चेतन घाटगे करत आहेत.
गोवा बनावटीच्या मद्यासह चोरटी वाहतूक करणारा टेम्पो जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2020 10:40 AM
liquor ban, kolhapur, Police गोवा बनावटीचे विदेशी मद्याची चोरटी वाहतूक करणारा मिनी टेम्पो आजरा ते मडिलगे मार्गावर सुलगाव (ता. आजरा) हद्दीत गुरुवारी सकाळी पकडला. कारवाईत आजरा पोलिसांनी सुमारे दीड लाखांचा मद्यसाठा व तीन लाख रुपये किमतीचा टेम्पो असा सुमारे ४ लाख ४८ हजार ९५२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला तर तिघांना अटक केली.
ठळक मुद्देआजरा पोलिसांची सुलगावनजीक कारवाई साडेचार लाखांचा मुद्देमाल; तिघांना अटक