कोल्हापूर : बाजार समित्यांच्या निवडणुका नवीन कायद्यानुसार होणार असून, त्यासाठी कार्यक्षेत्रातील दहा गुंठे क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार मिळणार आहे. या निर्णयामुळे विकास संस्था व ग्रामपंचायतीच्या सदस्यांची मक्तेदारी मोडीत निघाली असली तरी वाढलेल्या मतदारांमुळे बाजार समित्यांची डोकेदुखी वाढणार हे निश्चित आहे.
बाजार समित्यांसाठी विकास संस्था व ग्रामपंचायतींचे सदस्य मतदानास पात्र होते. त्यामुळे ज्यांच्या ताब्यात विकास संस्था व ग्रामपंचायती, त्याच पक्षाचे बाजार समित्यांवर वर्चस्व राहिले. त्यामुळे सामान्य शेतकरी निवडणूक प्रक्रियेपासून लांब राहिला होता. नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीबाबत नुकताच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय दिल्याने जुन्या की नवीन अध्यादेशानुसार निवडणुका ही संभ्रमावस्था दूर झाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्णात साडेसहा तालुक्यांची कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती, गडहिंग्लज, चंदगड, आजरा आणि निम्म्या कागल तालुक्याची गडहिंग्लज बाजार समिती, हातकणंगले तालुका मर्यादित पेठ वडगाव बाजार समिती आणि शिरोळ तालुक्याची जयसिंगपूर शेती उत्पन्न बाजार समिती अशा चार समित्या कार्यरत आहेत. या समित्यांच्या निवडणुका नवीन अध्यादेशांनुसारच होणार आहेत. त्यानुसार प्रशासनाला तयारी करावी लागेल. दहा गुंठ्यांवरील सर्वच शेतकºयांना मतदानाचा अधिकार मिळणार आहे.दहा गुंठेवाल्यांना मतदानाचा अधिकारबाजार समिती निवडणूक : मतदार वाढल्याने डोकेदुखी वाढलीकोल्हापूर : बाजार समित्यांच्या निवडणुका नवीन कायद्यानुसार होणार असून, त्यासाठी कार्यक्षेत्रातील दहा गुंठे क्षेत्र असणाºया शेतकºयांना मतदानाचा अधिकार मिळणार आहे. या निर्णयामुळे विकास संस्था व ग्रामपंचायतीच्या सदस्यांची मक्तेदारी मोडीत निघाली असली तरी वाढलेल्या मतदारांमुळे बाजार समित्यांची डोकेदुखी वाढणार हे निश्चित आहे.
बाजार समित्यांसाठी विकास संस्था व ग्रामपंचायतींचे सदस्य मतदानास पात्र होते. त्यामुळे ज्यांच्या ताब्यात विकास संस्था व ग्रामपंचायती, त्याच पक्षाचे बाजार समित्यांवर वर्चस्व राहिले. त्यामुळे सामान्य शेतकरी निवडणूक प्रक्रियेपासून लांब राहिला होता. नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीबाबत नुकताच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय दिल्याने जुन्या की नवीन अध्यादेशानुसार निवडणुका ही संभ्रमावस्था दूर झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्णात साडेसहा तालुक्यांची कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती, गडहिंग्लज, चंदगड, आजरा आणि निम्म्या कागल तालुक्याची गडहिंग्लज बाजार समिती, हातकणंगले तालुका मर्यादित पेठ वडगाव बाजार समिती आणि शिरोळ तालुक्याची जयसिंगपूर शेती उत्पन्न बाजार समिती अशा चार समित्या कार्यरत आहेत. या समित्यांच्या निवडणुका नवीन अध्यादेशांनुसारच होणार आहेत. त्यानुसार प्रशासनाला तयारी करावी लागेल. दहा गुंठ्यांवरील सर्वच शेतकºयांना मतदानाचा अधिकार मिळणार आहे.निवडणुका आताप्राधिकरणाकडून होणारसध्या पाच कोटींपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या बाजार समित्यांच्या निवडणुका जिल्हा उपनिबंधक, तर त्यापेक्षा अधिक निवडणुका जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत घेतल्या जातात; पण हे सर्व रद्द करून येथून पुढे निवडणूक प्राधिकरणाच्या माध्यमातून सर्वच समित्यांच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत.नवीन संचालक मंडळशेतकरी प्रतिनिधी - १५ पैकीसर्वसाधारण - १०महिला प्रतिनिधी - २अनुसूचित जाती - १इतर मागासवर्गीय - १भटक्या विमुक्त जाती - १हमाल-तोलाईदार - १अडते-व्यापारी - २स्वीकृत- जिल्हा उपनिबंधक - १