शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

जिल्ह्यातील अकरा योजनांकडे दहा कोटींची पाणीपट्टी थकित

By admin | Published: February 02, 2015 11:20 PM

वीज बिलाच्या थकबाकीचा डोंगर : पांढरा हत्ती पोसणार कोण?

सांगली : जिल्ह्यातील अकरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांकडे दहा कोटींची पाणीपट्टी थकित आहे. यामुळे महावितरणचे वीज बिल वेळेवर भरले जात नसल्यामुळे दोन महिन्याला योजनांचा वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे १०३ गावांतील जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दिवसेंदिवस पाणीपट्टी आणि वीज बिलाच्या थकबाकीचा डोंगर वाढत असल्यामुळे प्रादेशिक पाणी योजनांचा पांढरा हत्ती कोण आणि कसा पोसणार?, असा प्रश्न निर्माण झाला आहे.जिल्हा परिषदेकडून सुरु असलेल्या अकरा प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनांपैकी बहुतांशी योजना कालबाह्य झालेल्या आहेत. काही योजना तर वीस ते पंचवीस वर्षापूर्वीच्या आहेत. या योजनांच्या वितरण व्यवस्थेला अनेक ठिकाणी गळती लागली आहे. यामुळे ग्रामस्थांना पुरेशा दाबाने पाणी मिळत नाही. या पाणी गळतीमुळे महिनाभर पाण्यापासून वंचित रहावे लागते. अन्य योजना, विहिरींचे पाणी ग्रामस्थांना प्यावे लागते. नियमित पाणी पुरवठा होत नसल्यामुळे ग्रामस्थांकडून पाणीपट्टी भरण्याकडे दुर्लक्ष होत आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्रामपंचायतीकडून पाणीपट्टी वसूल झाल्यानंतर २० टक्के गावातील विकासासाठी निधी ठेवून ८० टक्के रक्कम जिल्हा परिषदेकडे जमा झाली पाहिजे. पण, ग्रामपंचायतींकडून वसूल केलेली रक्कमच जिल्हा परिषदेकडे भरली जात नसल्याची धक्कादायक माहितीही पुढे आली आहे. यामुळे योजनांकडील कोट्यवधीच्या थकित पाणीपट्टीचा डोंगर दिवसेंदिवस वाढत आहे. यातूनच महावितरण कंपनीचीही थकबाकी वाढली आहे. सध्या अकरा प्रादेशिक योजनांकडेच महावितरणची वीज बिलाची आठ कोटींची थकबाकी आहे. या थकबाकी वसुलीसाठी वारंवार महावितरण कंपनीकडून वीज पुरवठा खंडित केला जात आहे. याचाही ग्रामस्थांना फटका बसत असून, पाण्यासाठी १०३ गावांतील लाखो ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. गावचे पुढारे, काही ग्रामसेवक, पाणी योजनेकडील कर्मचाऱ्यांच्या चुका आणि कालबाह्य योजनांमुळे प्रादेशिक योजना चालविणे हेच गावे आणि जिल्हा परिषदेसमोर आव्हान आहे.(प्रतिनिधी)प्रादेशिक योजनांकडील थकबाकीयोजनागावांची संख्यापाणी कनेक्शनथकबाकीमणेराजुरी२६४६६६१०५.५५ लाखयेळावी९१४२८१९.६६ लाखपेड४९३३१९.४४ लाखक़महांकाळ/ विसापूर१६३४०१५६.२० लाखकुंडल१७५८७९२०२.४६ लाखरायगाव५१९०२२.२४ लाखकासेगाव१५१६४९७२७२.३५ लाखजुनेखेड/ नवेखेड२५८०३५.३४ लाखनांद्रे-वसगडे७७६४२२७.०१ लाखतुंग-बागणी९१०८४१०५.२१ लाखवाघोली३१०९२३.७७ लाखएकूण१०३४१७३७९३३.२३ लाख