१) ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीमध्ये कोणतेही महाविद्यालय अलॉट झाले नाही त्यांना निश्चित प्रवेश मिळेल.
२) ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीमध्ये महाविद्यालय अलॉट झाले आहे; पण त्यांनी आपला प्रवेश निश्चित केला नाही. भाग दोन अर्जामध्ये कोणताही बदल करणार नाहीत अशा सर्व विद्यार्थ्यांची नावे दुसऱ्या फेरीमध्ये आपोआप (ऑटो शिफ्ट) घेतली जातील.
प्रतिक्रिया
दुसरी फेरी ही अंतिम फेरी असेल. त्याद्वारे अलॉट झालेल्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेश घेणे विद्यार्थ्यांना बंधनकारक आहे. त्यानंतर कोणताही प्रवेश इयत्ता अकरावी केंद्रीय प्रवेश समितीतर्फे केला जाणार आहे. शासनाकडून आदेश प्राप्त झाल्यानंतर अकरावीचे वर्ग सुरू करण्याची सूचना महाविद्यालयांना केली जाईल.
-सुभाष चौगुले
फोटो (१५०९२०२१-कोल-अकरावी प्रवेश) : कोल्हापुरात गेल्या सात महिन्यांपासून लसीकरणासाठी रांगा लागला होत्या. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने जनजीवन पूर्वपदावर येत आहे. बुधवारी शहरातील डीआरके कॉमर्स कॉलेजमध्ये इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची रांग लागल्याचे पाहून कोरोनाचा विळखा सैल झाल्याचे सुखद चित्र दिसून आले. (छाया : आदित्य वेल्हाळ).
150921\15kol_7_15092021_5.jpg
फोटो (१५०९२०२१-कोल-अकरावी प्रवेश) : कोल्हापुरात गेल्या सात महिन्यांपासून लसीकरणासाठी रांगा लागला होत्या. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने जनजीवन पूर्वपदावर येत आहे. बुधवारी शहरातील डीआरके कॉमर्स कॉलेजमध्ये इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची रांग लागल्याचे पाहून कोरोनाचा विळखा सैल झाल्याचे सुखदायक चित्र दिसून आले. (छाया : आदित्य वेल्हाळ).