कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत २४ फेबु्रवारी २0१९ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे. गुणपडताळणीसाठी २७ मे २0१९ या कालावधीत आॅनलाईन अर्ज करण्याचे आवाहन परिषदेने केले आहे.जिल्ह्यात २४ फेब्रुवारी रोजी ५ वी आणि ८ वीच्या एकूण २३६ केंद्रांवर ३६७५३ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यानंतर गुरुवारी हा अंतरिम निकाल जाहीर करण्यात आला; मात्र तो शाळांच्या लॉगिनवर कळत असल्याने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून याबाबत अधिक माहिती देण्यासाठी मर्यादा आल्या.गुणपडताळणीसाठी संबंधित शाळांच्या लॉगिनमध्ये १६ मे ते २७ मे या दरम्यान उपलब्ध असलेल्या आॅनलाईन अर्जाच्या माध्यमातून गुणपडताळणी करावयाची असून, प्रत्येक पेपरसाठी ५0 रुपये आॅनलाईन भरावे लागणार आहेत. विहित मुदतीत आलेल्या अर्जानुसार गुणपडताळणीचा निर्णय अर्ज प्राप्त झाल्यानंतर ३0 दिवसांत शाळेच्या लॉगिनवर कळविण्यात येणार आहे. यानंतर अंतिम निकाल आणि गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
निकालाला लागला उशीरपरिषदेच्या संकेतस्थळावर गुरुवारी दुपारी ३ वाजता हा निकाल उपलब्ध होणार होता; मात्र संकेतस्थळाशी संपर्क होत नसल्याने चारनंतर अनेकांना निकाल पाहावयास मिळाला; त्यामुळे पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांची उत्सुकता ताणली गेल्याचे चित्र पाहावयास मिळाले.