शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
3
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
4
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
5
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
6
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
7
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
8
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
9
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
10
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
11
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
12
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
13
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
14
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
15
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
16
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
17
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
18
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
19
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

भयग्रस्त माणसे.. मदतीची प्रतीक्षा... अन् कचऱ्याची दुर्गंधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 1:04 AM

चंद्रकांत कित्तुरे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : चारीही बाजूंनी महापुराचा वेढा... ८५ टक्के गाव पाण्याखाली... राहिलेल्या उंचवट्यावरील भागातील ...

चंद्रकांत कित्तुरे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : चारीही बाजूंनी महापुराचा वेढा... ८५ टक्के गाव पाण्याखाली... राहिलेल्या उंचवट्यावरील भागातील घरांमध्ये खचाखच भरलेली भयग्रस्त माणसे... शासकीय मदत कधी पोहोचते याची सुरू असलेली प्रतीक्षा... महापुराच्या पाण्यामुळे मेलेल्या जनावरांच्या आणि कुजलेल्या कचºयाची दुर्गंधी, यामुळे होणारी असह्य घालमेल, अशा परिस्थितीत कुरुंदवाडशहरातील उरल्यासुरल्या माणसांना रहावे लागत असल्याचे चित्र रविवारी होते.‘लोकमत चमू’ने रविवारी शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा करून प्रत्यक्ष वस्तुस्थिती जाणून घेतली असता मिळालेली माहिती अन् प्रत्यक्षातील स्थिती खूपच वेगळी असल्याचे जाणवले. कुरुंदवाड हे पंचवीस हजार लोकसंख्येचे शहर. श्री दत्तात्रेयांच्या नृसिंहवाडीमुळे कुरुंदवाड शहरही सर्वांच्या परिचयाचे. आजपर्यंत कधीही आला नव्हता असा महापुराचा अनुभव हे शहर सध्या घेते आहे.शहरातील ८५ टक्क्यांहून अधिक भाग महापुराच्या पाण्याखाली गेल्याने शेकडो घरे बुडालेली आहेत. काही घरांचे केवळ छत पाण्यावर दिसते आहे. शहरातील चावडी व राजवाडा परिसर, दिवटे गल्ली, कुंभार गल्ली, दत्त महाविद्यालय आणि एसपी हायस्कूल परिसर एवढाच उंचवट्यावरील भाग महापुराच्या पाण्याबाहेर आहे. चारीही बाजूंनी पाण्याने वेढल्यामुळे गेल्या मंगळवारपासून या शहराचा जगाशी संपर्क तुटलेला आहे. त्यांना पहिली मदत शनिवारी पोहोचली. हेलिकॉप्टरमधून अन्नाची पाकिटे टाकण्यात आली. हीच बाहेरून मिळणारी पहिली मदत. तोपर्यंत पाणी वाढेल तसतसे नागरिक नातेवार्इंकाकडे, शिबिरामध्ये स्थलांतरित होऊ लागले. मंगळवारी महापुराने पुरते वेढले आणि बाहेर जाण्याचे सर्वच मार्ग बंद झाले.वर उल्लेख केलेल्या शहरातील उंचवट्याच्या भागात अडकलेल्या नागरिकांनी एकमेकांना आधार देत जगण्याची लढाई चालू ठेवली. उपनगराध्यक्ष अक्षय आलासे, नगरसेवक जवाहर पाटील, माजी नगरसेवक बाळिशा दिवटे, दादा पाटील, माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे, जिनगोंड पाटील, अरुण आलासे, आनंद पाटील, माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील, अभिजित पाटील, किरण जोंग यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांनी शहरातअडकलेल्या नागरिकांना आधार दिला आहे. पुराच्या पाण्यात जाऊन माणसांना बाहेर काढले आहे.सध्या चार माणसे ज्या घरात रहात होती, त्या घरात पंधरा-वीस, तर दुमजली, तीन मजली इमारतीत शंभर-दीडशे लोक दाटीवाटीने रहातआहेत.कुरुंदवाडमधील परिस्थिती सांगताना तेथे अडकेले विजय टारे म्हणाले, शासनाने वेळेत मदत न दिल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले; पण शहरातील नागरिकांनीच केवळ शेजारधर्म नव्हे, तर माणुसकीचा धर्मही जागवला आहे. पुराचे पाणी कमी झाल्यानंतर उद्भवणाºया रोगराईला तोंड कसे द्यायचे, याची चिंताही सर्वांना लागून राहिली आहे.शासकीय मदतीला उशीररविवारी हेलिकॉप्टरने मदत देण्यात आलीच शिवाय बोटीनेही मदत पोहोचविली गेली. त्यात पाणी उतरू लागल्याने या सर्वांच्या चेहºयावर दिलासा मिळाल्याचे भाव होते. मात्र, शासकीय मदत वेळेत न पोहोचल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत होता.जनावरे रस्त्यावरमहापूर वाढेल तसे नागरिकांनी जनावरांना रस्त्यावर तसेच इमारतींमध्ये ठेवले आहे. ही जनावरेही अंत्यत दाटीवाटीने उभी आहेत. त्यांना जगण्यापुरते चारापाणी कसेतरी उपलब्ध करून दिले जात आहे. या जनावरांचेही प्रचंड हाल होत आहेत. अनेक जनावरे वाहून गेल्याचेही समजते.अनेक घरांची पडझडशहरातील पुराच्या पाण्यात बुडालेल्या अनेक घरांची पडझड झाली आहे. पूर उतरताच जुनी असलेली आणखी घरे कोसळतील असे चित्र आहे. त्यामुळे घरांची पडझड झालेल्यांना निवारा देण्याचे आव्हानही मोठे असणार आहे.