शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

वाळूसम्राटाच्या दलालाची प्रांतांना धमकी

By admin | Updated: July 20, 2014 23:19 IST

राजकीय दडपण : पोलिसांत गुन्हाच नाही; ‘लेखणी बंद’ करणारे महसूल कर्मचारीही मूग गिळून

फलटण : वाळूसम्राटांसाठी दलालीचे काम करणाऱ्या ठाकुरकी (ता. फलटण) येथील एकाने प्रांदाधिकाऱ्यांनाच शिवीगाळ, दमदाटी व जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. या व्यक्तीला आणि त्याच्या साथीदारांना प्रांताधिकाऱ्यांनी पकडूनही राजकीय हस्तक्षेपामुळे पोलिसांत गुन्हा नोंद झालेला नाही. हतबल प्रांताधिकाऱ्यांवर राजकीय दडपण आणले जात असून, एरवी ‘लेखणी बंद’ आंदोलन करणारे महसूल अधिकारीही मूग गिळून गप्प आहेत.फलटण तालुक्यात कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले असून, राजकीय पाठबळामुळे वाळूसम्राटांकडून अधिकाऱ्यांना धमकावण्याचे प्रकार सुरू आहेत. १५ दिवसांपूर्वीच वाळू पकडायला गेलेल्या तहसीलदारांच्या गाडीवर ट्रॅक्टर घालण्याचा व शिवीगाळ करून दमदाटीही केल्याचा प्रकार घडला होता. वाळूउपशाला प्रामाणिकपणे विरोध करणाऱ्या तलाठ्यांनाही मारहाणीच्या घटना घडल्या आहेत. काही वाळूसम्राट व काही महसूल कर्मचाऱ्यांची साखळी निर्माण झाली असून , यासाठी काही दलाल कार्यरत आहेत. काही वाळूसम्राटांची दुकानदारी चालविण्यासाठी हे दलाल मध्यस्थाची भूमिका बजावतात.शनिवारी दुपारच्या सुमारास तहसील कार्यालयाच्या आवारात दलालीचे काम करणाऱ्या ठाकुरकी येथील एकाने मोबाइलवरून ‘कॉल डायव्हर्ट’ करून गोळेवाडी येथे वाळूउपसा सुरू असल्याची माहिती प्रांताधिकारी जाधव यांना दिली. जाधव हे त्यांच्या गाडीतून घटनास्थळी पोहोचले; मात्र तेथे वाळूउपसा पूर्ण झालेला होता. तेथे कोणीच नव्हते. प्रांताधिकाऱ्यांनी आलेल्या नंबरवर फोन केला असता, त्या व्यक्तीने त्यांना ‘तुमचे लागेबांधे असतील, त्यामुळे तुम्ही कारवाई करत नाही,’ असे म्हणून शिवीगाळ केली. प्रांताधिकाऱ्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केल्यावर त्याने जिवे मारण्याची धमकी दिली. फलटणला आल्यावर प्रांताधिकाऱ्यांनी पोलिसांना बोलावून पुन्हा त्या नंबरला फोन लावला. तो नंबर सुरवडी (ता. फलटण) येथील एकाचा असल्याचे समजले. त्याला प्रांताधिकाऱ्यांनी कार्यालयात बोलाविले असता त्यानेही प्रांताधिकाऱ्यांना अरेरावीची भाषा वापरली. त्याच्या चौकशीदरम्यान त्याच्या मोबाइलवर ‘कॉल डायव्हर्ट’ करून दुसऱ्यानेच फोन केल्याचे आढळून आले. फोन करणारा ठाकुरकी येथील असल्याचे समोर आले. काही वाळूसम्राटांसाठी तो मध्यस्थ म्हणून काम करीत असल्याचे लक्षात आले. ‘छुप्या अर्थकारणा’त व्यत्यय आल्याने वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई व्हावी, या हेतूनेच त्याने प्रांतांना फोन केल्याचे अनेकांच्या लक्षात आले. त्याला ताब्यात घेतल्यावर स्वत: प्रांतांनी त्याची धुलाई केली. प्रांताधिकारी गुन्हा दाखल करीत असतानाच त्यांच्या मोबाइलवर एका नेत्याचा फोन आला व ‘गुन्हा दाखल करू नये,’ असे सांगून दबाव आणला. दबावापोटी प्रांताधिकाऱ्यांना गुन्हा नोंदविता आला नाही व आरोपीला सोडून द्यावे लागले. (प्रतिनिधी)४७ लाखांचा अनधिकृत वाळूउपसाखटाव तालुका : विखळे हद्दीत वाळू माफियांचे साम्राज्यवडूज : विखळे, ता. खटावच्या हद्दीत अनधिकृत वाळूउपसा केल्याप्रकरणी महसूल विभागाच्या भरारी पथकाने कारवाई करून सुमारे ४६ लाख ८० हजार इतका दंड व जबरी चोरी केली असल्याची तक्रार १३ जणांविरोधात वडूज पोलीस ठाण्यात दिली आहे. याबाबत महसूल विभागाने दिलेली माहिती अशी की, विखळे येथील चावर वस्ती (माळीवस्तीनजीक), कलेढोण ते मायणीकडे वाहणाऱ्या ओढ्यात एका जेसीबी (विनानंबर)चे मालक संजय माळी व चालक विजय रवी पवार (रा. मायणी) हे अवैधरीत्या वाळू उत्खनन करीत होते. येथील पाच गटांतील मिळून अवैधरीत्या ३,९०० ब्रॉस इतकी वाळू उत्खनन केली गेली. गट नंबर १०६६ मध्ये ओढ्यातून उत्तरेकडे जाण्यासाठी शंकर रामू घार्गे यांनी आपल्या हद्दीतून संबंधित वाहने जाणे-येण्यासाठी रस्ता करून दिला होता. तसेच त्याचा साठा करून ठेवण्यासाठी आपले शेतही उपलब्ध करून दिलेले होते.भरारी पथकाने पकडलेले डंपर (एमएच १० एडब्ल्यू ४५२७) चे मालक मंगेश बाळू चौगुले, चालक चंद्रकांत उत्तम चौगुले (रा. विटा), तसेच डंपर (एमएच १० झेड ४६९५)चे मालक दीपक शितोळे, चालक अनिल लक्ष्मण पवार, शुभम महेश कोळी (रा. विटा). डंपर (एमएच १० एडब्ल्यू ५२२९) चे मालक सलमान आगा, चालक अमोल शंकर चव्हाण (रा. विटा). डंपर (एमएच १० झेड ३५२६) चे मालक सोमा तोडकर, चालक दत्तात्रय लालासाहेब रावताळे (रा. गार्डी) व जेसीबी विनानंबर मालक व चालकांवर महसूल अधिनियम १९६६ च्या कलम ४८ नुसार बाजार मूल्यांकनाच्या तिप्पट इतका दंड आकारला. एकूण ३,९०० ब्रॉस अवैध वाळूउपसा केल्याप्रकरणी ४६ लाख ८० हजार इतका दंड आकारला आहे. संबंधित १३ जणांविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत वडूज पोलीस ठाण्यात सुरू होते. (प्रतिनिधी)