शासनाने जास्तीत जास्त वर्क फ्रॉम होमला प्राधान्य देण्यास सुचविले आहे. यामुळे पुणे, मुंबईसह अन्य जिल्ह्यांत काम करणारे नागरिक कोल्हापूर जिल्ह्यात परतत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून असंख्य वाहने कोल्हापुरात दाखल होत आहेत. या नागरिकांचे आपण जिल्ह्यात स्वागत करूया. मात्र, कोरोना पार्श्र्वभूमीवर खबरदारी घेणे गरजेचे आहे. पुणे, मुंबईसह अन्य जिल्ह्यांतून कोल्हापुरात येण्यासाठी प्रवास सुरू करण्यापूर्वी नागरिकांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी. प्रवासातही कोरोना संक्रमणाचा धोका नाकारता येत नाही. कोल्हापुरात आल्यानंतर सर्वप्रथम कोरोनाची चाचणी करूनच घरात प्रवेश करावा. कोरोना संक्रमणाचा धोका टाळून आपले घर, गाव, जिल्हा कोरोनापासून दूर राहील. कोरोनाची लक्षणे दिसताच डॉक्टरांच्या सल्ल्याने वैद्यकीय उपचार घ्यावेत, असे आवाहन आमदार जाधव यांनी केले.
कोरोनाची चाचणी करून घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2021 4:26 AM