शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

वस्त्रोद्योग नगरीत गुन्हेगारांची ‘धडधड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2018 12:45 AM

अतुल आंबी ।लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : इचलकरंजीत गेल्या तीन वर्षांत खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, मारामारी, घरफोडी असे २९२ गंभीर गुन्हे नोंद झाले आहेत. वस्त्रनगरीतील गुन्हेगारी वाढून तिची ‘क्राइम नगरी’कडे वाटचाल झाली आहे. या नगरीवर वर्चस्व मिळविण्यासाठी गुन्हेगारांच्या टोळ्या तयार झाल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण १४ टोळ्यांना ‘मोक्का’ लावण्यात आला, त्यांतील ...

अतुल आंबी ।लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : इचलकरंजीत गेल्या तीन वर्षांत खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, मारामारी, घरफोडी असे २९२ गंभीर गुन्हे नोंद झाले आहेत. वस्त्रनगरीतील गुन्हेगारी वाढून तिची ‘क्राइम नगरी’कडे वाटचाल झाली आहे. या नगरीवर वर्चस्व मिळविण्यासाठी गुन्हेगारांच्या टोळ्या तयार झाल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण १४ टोळ्यांना ‘मोक्का’ लावण्यात आला, त्यांतील इचलकरंजीच्या सर्वाधिक दहा टोळ्या आहेत. त्यावरून या गुन्हेगारीचे स्वरूप स्पष्ट होते. पिस्तूल जवळ बाळगणाऱ्या ७२ जणांवर कारवाई करून पोलिसांनी तेवढीच पिस्तुले जप्त केली आहेत.गुन्हेगारीचा आलेख पाहता सन २००९ ते २०१५ पर्यंतच्या गुन्हेगारीच्या तुलनेत सन २०१६ ते २०१८ या तीन वर्षांत खून, खुनाचा प्रयत्न, रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण, गर्दी-मारामारी या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे दिसते. तीन वर्षांमध्ये खून १८, खुनाचे प्रयत्न ४२, गंभीर मारहाण १७४, गर्दी-मारामारी ८० व घरफोड्या ७८ झाल्याचे चित्र दिसते. सुरुवातीला बाहेरहून कामानिमित्त आलेल्या कामगारांना धमकावणे, त्यांच्या पगारातील रक्कम काढून घेणे; येथून सुरू झालेला गुन्हेगारीचा प्रवास वाढत जाऊन मालक, उद्योजक, व्यापारी यांना धमकावत त्यांच्याकडून महिन्याला हप्ता ठरवून घेऊन खंडणी गोळा करण्यापर्यंत पोहोचला. खंडणीची रक्कम एक हजार रुपयांपासून ते एक कोटीपर्यंत असल्याची पोलीस दप्तरी नोंद आहे. जो खंडणी देण्यास नकार देतो, त्याचा मुदडा पाडण्यासही हे गुन्हेगार मागे-पुढे बघत नव्हते. त्यामुळे त्यांची दहशत निर्माण होऊन गुन्हेगारी फोफावली. अशा अनेक गुन्हेगारांनी मोठे गुंड बनून अवैध मार्गाने मिळविलेला पैसा अवैध व्यवसायांत गुंतविला. त्यातूनही माया जमवत पुढे जाऊन ते दादा बनले. त्यानंतर राजकारणात घुसून नेतेही बनले.अवैध व्यवसायांसह शहरात क्रिकेट बेटिंग (सट्टा), मटका, गुटखा, गुटखानिर्मिती कारखाना, गावठी दारूअड्डे, घातक शस्त्र व पिस्तूल जवळ बाळगण्याचे प्रकार, मुलींची छेडछाड, विनयभंग, बलात्कार, फसवणूक अशा सर्व प्रकारच्या गुन्ह्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. गुन्हेगारीचा आलेख वाढून दिसू नये, याची खबरदारी घेत मारामारीचे व गंभीर गुन्हेदेखील अदखलपात्र म्हणून दाखल केले जातात. अनेक गुन्हे नोंद न करता परस्पर मिटविण्याचेही प्रकार होत आहेत.इचलकरंजी शहर परिसरातील अवैध व्यवसायही चांगलेच फोफावले आहेत. शहरातील कामगार वस्ती व अवैध व्यवसायातील वरपर्यंत निर्माण झालेली साखळी यामुळे हे व्यवसाय बिनदिक्कतपणे सुरू आहेत. फसवणूक करणे व वस्त्रोद्योगातील काही व्यवसायांमध्ये हस्तक्षेप करून कमिशनच्या नावाखाली दादागिरीने आपला वाटा ठेवणे. जागा खरेदी-विक्री व्यवहारात दमदाटीने सहभाग घेऊन आपला हिस्सा घेणे, असे अनेक प्रकार सुरू आहेत.शहरातील पोलीस ठाण्यांतील दहा वर्षांमध्ये गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण पाहिल्यास गुन्हेगारी वाढल्याचे दिसते. सन २०१५ पूर्वी शहरात दोन पोलीस ठाणी होती. सन २०१५ नंतर एक पोलीस ठाणे नवीन झाले. शिवाजीनगर, गावभाग (इचलकरंजीपोलीस ठाणे) व नव्याने निर्माण झालेले शहापूर पोलीस ठाणे या तीनही पोलीस ठाण्यांतील दाखल गुन्हे पाहता, हा विळखा साºया शहरालाच बसल्याचे चित्र दिसते.गुन्हेगारीचा आलेख असावर्ष २०१६गुन्ह्याचा प्रकार शिवाजीनगर गावभाग शहापूर एकूणखून ०४ ०० ०२ ०६खुनाचा प्रयत्न ०२ ०१ ०२ ०५गंभीर मारहाण २६ २० १० ५६गर्दी, मारामारी २१ ०५ ०६ ३२चोरी-घरफोडी १० ०३ ०६ १९वर्ष २०१७खून २ १ २ ५खुनाचा प्रयत्न ११ ५ ४ २०गंभीर मारहाण ३७ १७ २० ७४गर्दी, मारामारी १७ २ ११ ३०चोरी-घरफोडी २२ ८ १२ ४२वर्ष २०१८ (आॅगस्टपर्यंत)खून ४ २ १ ७खुनाचा प्रयत्न १० ३ ४ १७गंभीर मारहाण २५ १२ ७ ४४गर्दी, मारामारी १४ १ ३ १८चोरी-घरफोडी ११ --- ६ १७