घाटगे म्हणाले, गोकुळ दूध संघातील विविध योजना प्रभावीपणे राबवून दूध उत्पादकांना योग्य न्याय देणार आहे. त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी गोकुळ दूध संघामार्फत निश्चितच प्रयत्न करणार, अशी खात्री त्यांनी यावेळी दिली. दुसऱ्यांदा गोकुळ दूध संघावर प्रतिनिधित्व करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी ग्रामस्थ व विविध दूध संस्थांचे आभार मानले. सभासदांचे हित डोळ्यासमोर ठेवून कारभार केला जाईल. कोणावरही अन्याय होणार नाही, असे ते यावेळी म्हणाले.
यावेळी माजी पं. सदस्य सुरेश मर्दाने, एम. टी. पोवार, उपसरपंच शरद पाटील, तानाजी सुतार, के. बी. वाडकर, विलास पाटील, श्रीपती वाडकर, जाधव सर व ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो ओळी
व्हनाळी, ता. कागल येते नूतन गोकुळ संचालक अंबरीशसिंह घाटगे यांचा सत्कार करताना पं. सदस्य सुरेश मर्दाने, एम. टी. पोवार, उपसरपंच शरद पाटील, तानाजी सुतार, के. बी. वाडकर, विलास पाटील, श्रीपती वाडकर व जाधव सर.