शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
2
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
3
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 
4
“पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप”: बाळासाहेब थोरात
5
वर्ध्यात कराळे मास्तरांना भररस्त्यात मारहाण; भाजप कार्यकर्त्याने हल्ला केल्याचा दावा
6
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
7
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
8
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
9
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
10
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल
11
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
12
गूढ वाढलं..! शेजाऱ्यांनी ऐकला भांडणाचा आवाज, मृत्यूपूर्वी हर्षितासोबत काय घडलं?
13
IND vs AUS: रोहित, गिल, शमी संघात नाहीत; 'या' खेळाडूचा कसोटी 'डेब्यू' जवळपास निश्चित
14
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
15
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'
16
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
17
लेकीचं नाव 'ऐजाह' ठेवल्यामुळे ट्रोल झाली टीव्ही अभिनेत्री, आले आक्षेपार्ह मेसेज; म्हणाली...
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
19
'या' इलेक्ट्रिक टू व्हीलरचा जलवा, वर्षभरात विक्री 10 लाखांच्या पुढे!
20
अखिलेश यादव यांच्या आरोपांनंतर EC ची मोठी कारवाई; निवडणूक आयोगाने दिल्या सूचना, अनेक अधिकारी निलंबित

बसर्गे पाणी योजनेतील ठेकेदारावर ‘मेहरबानी’

By admin | Published: December 29, 2015 12:58 AM

काम पूर्ण न होताच निधी : एकाच कामाच्या दोनवेळा निविदा, ‘फौजदारी का करू नये’ अशी नोटीस

भीमगोंडा देसाई-- कोल्हापूर -गडहिंग्लज तालुक्यातील राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत एकाच कामाच्या दोनवेळा निविदा काढणे, काम पूर्ण न होताच ठेकेदाराला निधी देऊन ‘मेहरबान’ होणे, शासकीय निधीचा दुरूपयोग करणे, असे चौकशीत स्पष्ट झाले आहे. त्या कामातही ढपला मारल्याचा संशय बळावला आहे. त्यामुळेच ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता समितीचे अध्यक्ष, सचिव, सर्व सदस्य, ठेकेदार परसू गिडाप्पा गाडीवड्डर (रा. भडगाव) यांना फौजदारी का करू नये, अशी नोटीस दिली आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अविनाश सुभेदार यांनी ही नोटीस बजावली आहे. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत (शाश्वतता) सन २०१३-१४ मध्ये गावात ट्रेंच गॅलरीचे काम मंजूर झाले. कामास दि. २७ जून २०१३ रोजी ११ लाख ८० हजार ८०० रुपयांना मंजुरी मिळाली. दि. १९ आॅगस्ट २०१३ रोजी यातील ४ लाख ६५ हजार ८८ रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. हे काम ठेकेदार परसू गाडीवड्डर यांनी केले आहे. ठेकेदार ट्रेंच गॅलरीचे फक्त पाच टक्के काम करून ४ लाख ६५ हजार ८८ काढले. ही रक्कम काढताना ग्रामपंचायतीला व आम्हाला कोणत्याही प्रकारची माहिती दिली नाही, अशी तक्रार तत्कालिन सदस्य महेश नाईक, कांचनकुमार घस्ती, सागर शिंदे, गौतम कांबळे यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्याकडे केली होती. या तक्रारीची गांभीर्याने चौकशी करण्यात आली. कामास प्रशासकीय मान्यता मिळण्यापूर्वी दि. २३ मे २०१२ रोजी पहिला आणि प्रशासकीय मान्यतेनंतरचा दि. ६ आॅगस्ट २०१४ रोजी दुसरा असे काम करण्याचे आदेश दिले आहेत. दुसऱ्या निविदेच्या प्रक्रियेनुसार दि. ५ आॅगस्ट २०१५ रोजी काम पूर्ण होणे आवश्यक होते. तथापि काम अपूर्ण अवस्थेत बंद आहे.निविदेतील तरतुदीनुसार काम करून घेऊन ठेकेदारास झालेल्या कामांच्या परिमानानुसार देयक अदा करणे आवश्यक होते; पण काम पूर्ण न होताच दि. १८ नोव्हेंबर २०१३ रोजी ठेकेदारास ४ लाख ८० हजार रुपये दिले आहे. मात्र, या कामाचे मापपुस्तक, व्हौचर फाईल उपलब्ध केले नाही, कामाशी संबंधित कागदपत्रे शासकीय अधिकाऱ्यांना दाखविलेली नाहीत, अपूर्ण अवस्थेत काम बंद करणे, अशा गंभीर अप्रशासकीय व वित्तीय अनियमितता झाल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. योजनेतील कामकाजावर लक्ष ठेवण्याच्या कर्तव्यात पाणीपुरवठा व स्वच्छता समितीचे अध्यक्ष, सचिव यांनी कसुरी करणे, जबाबदारी पार न पाडणे, सदस्य व ठेकेदारांचे आर्थिक संगनमत असल्याचेही चौकशी अहवालात म्हटले आहे.यामुळेच ठेकेदार गाडीवड्डरसह अध्यक्ष, सचिव, सर्व सदस्यांना फौजदारी का करू नये, अशी नोटीस दिली आहे. नोटिसाला उत्तर दिल्यानंतर पुढील कारवाई होणार आहे.माहिती देण्यास देसार्इंची टाळाटाळ..बसर्गे आणि आमजाई व्हरवडे पाणी योजनेची माहिती जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुषमा देसाई यांच्याकडे मागितली असता, त्यांनी सोयीस्करपणे उत्तर देत माहिती लपविली. त्यामुळे भ्रष्टाचार, गैरव्यवहार करणाऱ्यांची माहिती न देण्यामागचे गुपित काय, असा सवाल उपस्थित होत आहे. ‘ढपल्यातील प्रसादा’मुळेच माहिती दिली जात नसल्याचा आरोपही होत आहे.