कोल्हापूर : यंदाच्या शिक्षक दिनी शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारे थँक्स अ टीचर अभियान राबविण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. यानिमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. ५ ते १० सप्टेंबर या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार आहे.ज्या शिक्षकांनी आपल्या आयुष्यात परिवर्तन आणले अशा शिक्षकांचे ह्यआभारह्ण व्यक्त करण्यासाठी शासनाकडून हे अभियान राबविले जाणार आहे. यानिमित्ताने आपल्या आवडत्या शिक्षकांबद्दल भावना व्यक्त करण्यांची संधी सर्वांना देण्यात येणार आहे.
कोरोनाच्या काळात अनेक शिक्षकांनी विविध माध्यमांतून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. त्यांना ज्ञानदान करण्याचे काम सुरूच ठेवले. अशा शिक्षकांबद्दल फेसबुक, ट्विटर, इन्स्ट्राग्रामच्या माध्यमातून कृतज्ञता व्यक्त करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.यानिमित्त ५ सप्टेंबर रोजी ह्यशाळा बंद, शिक्षण सुरूह्ण या उपक्रमामध्ये कोरोना काळात राबविण्यात आलेल्या विविध तंत्रस्नेही शिक्षकांच्या यशोगाथा शाळा, केंद्र शाळा, तालुका व जिल्हा स्तरावर सादर करण्यात येणार आहेत.
कोविड १९ काळातील शिक्षणावर परिसंवाद घेण्यात येणार असून वक्तृत्व, निबंध, पोस्टर, घोषवाक्य, कविता, प्रेरणा व प्रबोधनात्मक गीत, नाट्य, अभिवाचन स्पर्धा घेण्यात येणार आहेत. ह्यमी कोविड योद्धाह्ण यामध्ये ज्या शिक्षकांनी या काळात कोरोनाबाबतच्या विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या, त्यांचे अनुभव कथक घेऊन त्यांच्या कामाचे कौतुक करण्यात येणार आहे.मान्यवरांना सहभागाचे आवाहनसर्व लोकप्रतिनिधी, कलावंत, साहित्यिक अशा समाजातील सर्व स्तरातील आणि क्षेत्रातील नागरिक आणि मान्यवरांनी आपापल्या ठिकाणी शाळांच्या या उपक्रमामध्ये सहभागी होऊन आपल्या गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करावी, असे आवाहनही शिक्षण विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.