दत्ता पाटीलम्हाकवे : राजकीयदृष्टया बलाढ्य असणाऱ्या काँग्रेस पक्षाला मैदानाबाहेरच रोखले तर देशावर पाच-पन्नास वर्षे राज्य करु, हा अजेंडा डोळ्यासमोर ठेवूनच राहूल गांधी यांच्यावर राजकीय आकसापोटी कारवाई केली असल्याची टीका माजी आमदार संजय घाटगे यांनी केली. केवळ सुडबुद्धीचे राजकारण करून भीतीपोटीच भाजपानेराहुल गांधींना मज्जाव करण्याचे षडयंत्र रचले असल्याचा आरोपही त्यांनी केला. केनवडे फाटा (ता.कागल) येथे राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ मविआच्या वतीने रास्तारोको करुन भाजपाचा जाहिर निषेध केला. यावेळी ते बोलत होते. घाटगे यांच्या नेतृवाखाली भाजपा व ईडी विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली. घाटगे म्हणाले, सत्तेचा गैरवापर करून ईडी सारखी तपास यंत्रणा चुकीच्या पद्धतीने वापरली जात आहे. यामुळेच आमदार हसन मुश्रीफ यांच्या सारख्या लोककल्याणकारी नेत्याला जाणीवपुर्वक टार्गेट केले जात आहे. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द होण्यासाठी २ वर्षाची शिक्षा सुनावली आहे. माञ, २ वर्षाची शिक्षा द्यायची हे कुठल्या कायद्यात आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केला.यावेळी गोकुळचे संचालक अंबरिषसिंह घाटगे, धनराज घाटगे, दत्ता पाटील (केनवडे), विश्वास दिंडोर्ले यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी शिवसिंह घाटगे, ए.वाय.पाटील, एम.बी.पाटील, काका सावडकर, बाबुराव शेवाळे, के.के.पाटील, अमर कांबळे, महेश पाटील, बाजीराव पाटील (केनवडे), अरूण पोवार आदी मविआचे कार्यकर्ते उपस्थित होते.राहुल गांधी तुम आगे बढो...लोकशाही दडपू पाहणा-या भाजप सरकारचा... धिक्कार असो... सुडबूध्दीने ईडी कारवाई करणा-या भाजप सरकारचा निषेध करत भाजपा विरोधी घोषणा देण्यात आल्या. तसेच, राहुल गांधी तुम आगे बडो.. हम तुम्हारे साथ है, उद्धव ठाकरे यांचा विजय असो.. अशा घोषणांनी कार्यकत्यांनी सुमारे तासभर रास्ता रोको केला. आंदोलनस्थळी कागल पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला होता.
..म्हणूनच राहुल गांधींवर कारवाई, माजी आमदार संजय घाटगे यांचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2023 4:51 PM