..त्यामुळे काही वाचाळवीर राहुल गांधी यांच्या विरोधात वक्तव्ये करतायत - सतेज पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 02:59 PM2024-09-18T14:59:49+5:302024-09-18T15:00:29+5:30

शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांचा आमदार सतेज पाटील यांनी घेतला समाचार

That why some of the wordsmiths are making statements against Rahul Gandhi says Congress leader Satej Patil | ..त्यामुळे काही वाचाळवीर राहुल गांधी यांच्या विरोधात वक्तव्ये करतायत - सतेज पाटील 

..त्यामुळे काही वाचाळवीर राहुल गांधी यांच्या विरोधात वक्तव्ये करतायत - सतेज पाटील 

कोल्हापूर : राहुल गांधी यांनी देशभरात ‘संविधान बचाव’चे वातावरण तयार केले आहे. त्याची धास्ती भाजप आणि मित्र पक्षांनी लोकसभेच्या वेळी घेतली, तशीच धास्ती विधानसभेलाही घेतली आहे. त्यामुळे काही वाचाळवीर खालच्या स्तरावर जाऊन गांधी यांच्या विरोधात वक्तव्ये करत असल्याचा आरोप काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केला. येत्या निवडणुकीत जनताच महायुतीला याचे उत्तर देईल असा इशाराही त्यांनी दिला.

शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांचा आमदार सतेज पाटील यांनी समाचार घेतला. आमदार पाटील म्हणाले, भाजपच्या पायाखालची वाळू सरकत चालली आहे. वाचाळवीरांच्या वक्तव्याला त्यांच्याच भाषेत आम्ही उत्तर देऊ शकतो, पण ती काँग्रेसची संस्कृती नाही. भाजपच्या ५ खासदारांनीच त्यांचे सरकार घटना बदलणार असल्याचे म्हटले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली ही घटना अबाधित राहिली पाहिजे ही भूमिका राहुल गांधींनी मांडली. याची सत्यता लोकांनाही माहीत आहे, असे पाटील यांनी सांगितले.

महायुतीत प्रचंड वाद

महायुतीमध्ये जागावाटपावरून बरेच वाद आहेत. त्यांच्या रिक्षाचे नटबोल्ट, चाके निखळू लागली आहेत. प्रत्येक जिल्ह्यात त्यांच्यात भांडणे आहेत. दुसरीकडे आमच्या महाविकास आघाडीत उत्तम समन्वय आहे. आमच्यात कोणतेही वाद नाहीत. बऱ्याच जागांवर एकमत झाले आहे. शंभरएक जागांवर चर्चा सुरू आहे. लोकसभेवेळी ४८ जागा आम्ही एकमताने लढवल्या होत्या, त्याच पद्धतीने एकमताने यावेळीही निवडणूक लढवू, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. जनता तिसरी आघाडी स्वीकारणे कठीण आहे. राज्यातील मतदार महाविकास आघाडीच्या बाजूनेच कौल देईल असा दावाही त्यांनी केला.

Web Title: That why some of the wordsmiths are making statements against Rahul Gandhi says Congress leader Satej Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.