शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

हातावरचे पोट, मुलाचा आईकडे वाढदिवसाचा हट्ट; ..अन् केला आत्महत्येचा प्रयत्न; कोल्हापुरातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 6:37 PM

पोलिस चौकीत, मुलाने केलेल्या आगळिकीचे कारण सांगतानाही त्या माऊलीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते.

कोल्हापूर : वाढदिवसानिमित्त मित्रांसाठी घरी जेवण करण्याचा मुलाचा हट्ट आईने पुरवला नाही या रागातून शालेय मुलाने राहत्या घरी पत्र्याच्या अँगलला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. सुदैवाने वेळीच आईने त्याचा गळफास सोडवल्याने अनर्थ टळला. या घटनेत अत्यवस्थ झालेल्या रेहान राजू खाटिक (१५, रा. शिरोली पुलाची, ता. हातकणंगले) याच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. हा प्रकार मंगळवारी (दि. १३) सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडला.हातावरचे पोट असलेल्या येथील एक महिला शिरोली एमआयडीसीमध्ये फाउण्ड्रीत वाळू चाळण्याचे काम करतात. तीन वर्षांपूर्वी पती साथ सोडून निघून गेला. त्यानंतरही नेटाने फाउण्ड्रीत काम करून मीनाज आपला मुलगा रेहानला सांभाळतात. आठवीत शिकणाऱ्या रेहानचा मंगळवारी वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त घरात मित्रांसाठी जेवण करण्याचा हट्ट त्याने आईकडे धरला. पण आर्थिक ओढाताणीमुळे आईने त्याला चिरमुरे, फरसाण आणि केक आणून वाढदिवस साजरा करण्यास सांगितले. याच रागातून रेहानने मंगळवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घराच्या छताला असलेल्या लोखंडी अँगलला ओढणीने गळफास घेतला.हा प्रकार लक्षात येताच आईने तातडीने रेहानचा गळफास सोडवून त्याला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. उपचारानंतर आता रेहानची प्रकृती स्थिर आहे; पण एकुलत्या मुलाने केलेल्या आत्महत्येच्या प्रयत्नामुळे आई अगतिक आहेत. सीपीआरच्या पोलिस चौकीत, मुलाने केलेल्या आगळिकीचे कारण सांगतानाही त्यांच्या डोळे वाहत होते. या घटनेची नोंद शिरोली पोलिस ठाण्यात झाली.आईची हतबलतामुलाच्या आईला दरमहा सात हजार रुपये पगार आहे. घरभाडे, लाइट बिल आणि पाणीपट्टीसाठी ३७०० रुपये खर्च होतात. उरलेल्या पैशात महिन्याचा बाजार, कपडे आणि मुलाच्या शाळेचा खर्च भागवावा लागतो. एवढ्या कमी पैशात वाढदिवस दणक्यात कसा करणार रे बाळा, असे त्या रेहानला समजावून सांगत होत्या.

दुसऱ्याने सरी घातली म्हणून..हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. आई-वडिलांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार न करता आपले हट्ट आणि लाड पुरवून घेणारी मुले अनेक घरात दिसतात. मुलांनीही परिस्थितीची जाणीव ठेवून थोडा समजूतदारपणा दाखवणे गरजेचे आहे. दुसऱ्यांना सरी घातली म्हणून आपण दोरीने गळा आवळून घेऊ नये, असे त्यासाठीच म्हटले जात असे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी