श्रीकांत ऱ्हायकरधामोड : माणसाने माणसावर प्रेम केल्याची अनेक उदाहरणे आपल्याला बघायला मिळतात. पण माणसानी एका जनावरावरती प्रेम करणं ही एक दुर्मिळच गोष्ट. धामोड गावातील असाच एक कुंडल नावचा बैल बैलगाडी शर्यत पोरकी करून गेला. पण या बैलाप्रती असलेली प्रेमाची प्रचिती जाधव कुटुबीयांकडून संपूर्ण धामोड परिसराला पहावयाला मिळाली. कुंडल बैलाच्या दफनविधी बरोबरच बारावीचा कार्यक्रम ही विधीवत पूजा करून केला. शेकडो लोकांच्या जेवणावळी घालत प्राणीमात्रा विषयची कृतज्ञता व्यक्त केली.धामोड येथील शेतकरी अशोक दतात्रय जाधव व त्यांचे बंधु बाजीराव दतात्रय जाधव यांनी २००७ साली आपल्या घरी कुंडलला आणले . कुंडलवरती जाधव कुटुंबीयाचा लळा वाढत गेला हौसेपाटी पाळलल्या बैलाला त्यांनी शर्यतीमध्ये पळवायला सुरुवात केली. हळूहळू कुंडलने शर्यतीत आपल्या नावाबरोबर मालकाचे नाव केले. त्यानंतर त्याने तब्बल ११५ शर्यतीमध्ये पहिला क्रमांक पटकावत नावलौकिक मिळवला. कुंडलच्या येण्याने प्रगती होत गेल्याने तो आमच्यासाठी देव असल्याचे जाधव कुटुंबीयांनी बोलून दाखवले.शर्यतीबरोबर शेती कामहीकुंडलने शर्यतीबरोबर शेतीचा गाडाही ओढला. गेल्या १७ वर्षात कुटुंबातीलच एक सदस्य बनलेल्या कुंडलचा १० जून रोजी मृत्यू झाला आणि सर्वांच्याच डोळ्यात अश्रू तरळले. आपल्या कुटुंबातील एक सदस्य गेल्याच्या भावनेतून त्यांनी माणसाप्रमाणे या बैलाचा अंत्यविधी विधीवत पूजा करून पार पडला. तसेच धामोड पंचक्रोशीत हजारो लोकांना गोडधोडाचे जेवण घातले. जाधव कुटुंबीयांनी एका माणसाप्रमाणे प्राणीमात्रावरती दाखवलेली भूतदया आज धामोड परिसरात चर्चेचा विषय बनली.
Kolhapur: बैलगाडी शर्यती गाजवणारा कुंडल 'देवाघरी' गेला, मालकाने केलं विधिवत अंत्यसंस्कार-video
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 6:04 PM