महाराष्ट्राला 'ते' न परवडणारं, जागृत राहून एकमेकांना साथ देऊया; अजित पवारांचं जनतेला आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 06:30 PM2023-02-17T18:30:15+5:302023-02-17T18:35:39+5:30

शिंदे-फडणवीस सरकार निर्णय घेताना समाजामध्ये जातीय सलोख्याला धक्का लागेल, समाजा समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशी भूमिका घेत आहे.

The decision of the Shinde-Fadnavis government would be a shock to the communal harmony in the society says Ajit Pawar | महाराष्ट्राला 'ते' न परवडणारं, जागृत राहून एकमेकांना साथ देऊया; अजित पवारांचं जनतेला आवाहन

महाराष्ट्राला 'ते' न परवडणारं, जागृत राहून एकमेकांना साथ देऊया; अजित पवारांचं जनतेला आवाहन

googlenewsNext

दत्ता पाटील

म्हाकवे : आम्ही निवडणुका संपल्यानंतर राजकारणाला फाटा देऊन सर्व समाजाला जाती-पाती, धर्म पंथांमध्ये अडकून न ठेवता युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाप्रमाणे वाटचाल करण्याची मुभा देतो. माञ, गेल्या आठ महिन्यात सत्तेवर आलेले शिंदे-फडणवीस सरकार निर्णय घेताना समाजामध्ये जातीय सलोख्याला धक्का लागेल, समाजा समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशी भूमिका घेत आहे. हे छञपती शाहू फुले आंबेडकर यासह थोर महापुरुषांच्या महाराष्ट्राला न परवडणारे आहे. त्यामुळे आपण सर्वांनी अधिक जागृत राहून एकमेकांना साथ देऊया असा निर्धार विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला.

केनवडे (ता. कागल) येथील १ कोटी रुपयांच्या फ्युच्युरिस्टिक क्लासरूमच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार हसन मुश्रीफ होते.

अजित पवार म्हणाले, राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना शुन्य टक्के व्याजदराने कर्ज, प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांचे अनुदान देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेतला होता. अद्याप काही शेतकऱ्यांना हे अनुदान मिळालेले नाही. ते सर्वांना मिळेपर्यंत आपले प्रयत्न सुरू राहतील असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला.

आमदार सतेज पाटील म्हणाले, येणारे युग हे तंत्रज्ञानाचे आहे. त्यामुळे त्याची सुरुवात कागल तालुक्यातून होत आहे ही कौतुकास्पद बाब आहे.

आमदार मुश्रीफ म्हणाले, शिक्षकांनी अपडेट होवून मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी नेहमीच सतर्क राहावे. प्रास्ताविक माजी सरपंच दत्ता पाटील-केनवडेकर यांनी केले. यावेळी माजी आमदार संजय घाटगे, आमदार राजेश पाटील, के.पी.पाटील, ए.वाय.पाटील, नविद मुश्रीफ, प्रविण भोसले, मनोज फराकटे, शशिकांत खोत, सरपंच अनुराधा शिंदे आदी उपस्थित होते.

Web Title: The decision of the Shinde-Fadnavis government would be a shock to the communal harmony in the society says Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.