शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
3
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
4
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
5
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
6
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
7
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
8
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
9
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
10
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
11
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
12
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
13
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
14
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
15
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
16
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
17
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
18
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
19
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
20
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज

मारहाणीचे निमित्त: कोल्हापुरात शिवसेनेच्या दोन गटांतील वाद पुन्हा उफाळला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 12:08 PM

कोल्हापूर : खासगी सावकारी करणारे राजेंद्र ज्ञानदेव वरपे यांच्याविरोधात कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्याच्या रागातून विरोधकांनी राज्य नियोजन मंडळाचे ...

कोल्हापूर : खासगी सावकारी करणारे राजेंद्र ज्ञानदेव वरपे यांच्याविरोधात कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्याच्या रागातून विरोधकांनी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्याविरोधात बदमानीचे षडयंत्र रचले आहे, असा आरोप क्षीरसागर यांच्या समर्थकांनी केला. संबंधित वरपे यांच्यावर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन पोलिस अधीक्षकांना देण्यात आले.दरम्यान, वरपे कुटुंबीयांना दमदाटी केल्याबद्दल क्षीरसागर यांचे पद मुख्यमंत्र्यांनी काढून घ्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने निवेदनाद्वारे दिला. वरपे मारहाण प्रकरणावरून शिवसेनेचा मुख्यमंत्री शिंदे गट व ठाकरे गट यांच्यातील वाद पुन्हा उफाळून आला.माजी आमदार राजेश क्षीरसागर आणि राजेंद्र वरपे यांच्यातील वादाला राजकीय स्वरूप आले आहे. शिवसेनेच्या शिंदे गट समर्थकांनी सोमवारी पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांना निवेदन देऊन वरपे यांच्यावर खासगी सावकारी प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी केली. ठाकरे गटाने राजेंद्र वरपे यांना पाठबळ देऊन क्षीरसागर यांच्याविरोधात भूमिका घेतली.जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलिस अधीक्षकांना निवेदन देऊन क्षीरसागर यांच्यावर कारवाईची मागणी केली. क्षीरसागर आणि वरपे यांच्या वादाचे व्हिडीओ, शिवगंगा संकुलाच्या टेरेसवरील जेवणावळीचे फोटो याचे रिल्सही व्हायरल करण्यात आले. पोलिस अधीक्षकांना निवेदने देण्यासाठी दोन्हींकडून मोठ्या संख्येने जमाव जमल्याने वातावरण काहीसे तणावपूर्ण बनले.

पोलिस निरीक्षकांना निलंबित करा : पवारक्षीरसागर यांच्याविरोधात फिर्याद दाखल करून घेण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांच्या कार्यपद्धतीबद्दल शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी प्रश्न उपस्थित केले. पोलिस निरीक्षक अविनाश कवठेकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी पोलिस अधीक्षकांकडे केली. दहशत माजवणाऱ्या माजी लोकप्रतिनिधीच्या विरोधात न्यायालयातही दाद मागणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

महाविकास आघाडीप्रणीत बदनामी : चव्हाणमाजी आमदार क्षीरसागर यांच्यावर आरोप करणारे राजेंद्र वरपे यांच्यावर खासगी सावकारीचा गुन्हा दाखल आहे. पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी क्षीरसागर यांनी पुढाकार घेतल्याच्या रागातून महाविकास आघाडीप्रणीत खासगी सावकार एकवटले आहेत. क्षीरसागर यांची बदनामी केल्याबद्दल गुन्हे दाखल करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी निवेदनाद्वारे केली.

वरपे यांच्यावर खासगी सावकारीचा गुन्हाक्षीरसागर यांच्याकडे दाद मागितल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून वरपे यांच्यावर कारवाई केली. त्याचा राग मनात धरून वरपे हा क्षीरसागर यांच्याशी वाद घालत आहे, अशी माहिती खासगी सावकारी प्रकरणातील तक्रारदार दीपक पिराळे, राहुल पिराळे आणि डॉ. शेजल पिराळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.केटरिंग व्यवसाय करणाऱ्या सीमा वसंत पाटील यांनीही शुक्रवारी (दि. ८) रात्री घडलेली हकीकत सांगून, वरपे यांच्यावर मारहाण केल्याचा आरोप केला. शिवगंगा संकुलातील रहिवासी प्रतिभा कांबळे, मृणाली वाकरेकर आणि अमृता बेलेकर यांनीही वरपे यांचे वर्तन विक्षिप्त असल्याचे सांगितले. क्षीरसागर यांच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेसाठी जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेRajesh Vinayakrao Kshirsagarराजेश विनायकराव क्षीरसागर