शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

Kolhapur: वारणा नदीपात्रात कोसळलेल्या कारचा चालक सुखरुप, तब्बल सहा दिवसांनी लागला शोध

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 1:16 PM

जीपीएस प्रणालीमुळे हा अपघात झाल्याचे उघडकीस आले होते

किणी: पुणे-बंगळुरू महामार्गावरील वारणा पुलावरून नदीपात्रात कोसळलेल्या कारचा चालक नजीर कांकनडगी याचा तब्बल सहा दिवसांनी शोध लागला असून, जिवंत असल्याने पाहून नातेवाइकांना आनंद झाला. त्याच्यावर इस्लामपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.कुंडलवाडी (ता.वाळवा जि.सांगली) येथे वास्तव्यास असणारा सेंट्रिंग कॉन्ट्रॅक्टर नजीर कांकनडगी मुळचा विजापूरचा असून, बुधवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास इरटिंगा कार (क्रमांक एमएच १० बीएम-८४२८) घेऊन कोल्हापूरहून कुंडलवाडीकडे जात असताना, पुणे बंगळुरू महामार्गावरील घुणकी येथे वारणा नदीपुलाच्या वळणावर त्याची नदीपात्रात कार कोसळली होती. दुसऱ्या दिवशी गुरुवारी जीपीएस प्रणालीमुळे हा अपघात झाल्याचे उघडकीस आल्यानंतर क्रेनच्या साहाय्याने वर काढण्यात आली. मात्र, कारचा चालक नजीर सापडला नसल्यामुळे शोधमोहीम सुरू होती. तब्बल सहा दिवसांनंतर मंगळवारी सकाळी मिरज रेल्वे स्थानकात सापडल्याचे व नजीर याच्यावर इस्लामपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे शोधमोहीम राबविणाऱ्या मित्र व नातेवाइकांनी सांगितले. या सर्व घटनेचा उलगडा तपासांती निष्पन्न होईल, असे वडगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विलास भोसले यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर