शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांची भेट, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
2
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
3
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
4
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
5
GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!
6
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
7
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
8
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
9
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
10
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
11
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
12
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
13
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
14
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
15
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
16
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं
17
राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
18
भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू
19
भिवंडीत कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ नवजात बाळाचा मृतदेह सापडला, परिसरात खळबळ!
20
Numerology: आयुष्याला कलाटणी देणारा सप्ताह; मुलांकानुसार जाणून घ्या साप्ताहिक भविष्य!

कोल्हापूर जिल्ह्यात २२०० सहकारी संस्थांची रणधुमाळी उडणार, आठवड्यात निवडणूक प्रक्रिया सुरु होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2024 13:20 IST

सर्वाधिक १६७० दूध संस्थांचा समावेश

कोल्हापूर : विधानसभेच्या निवडणुका संपल्याने आता सहकारी संस्थांची रणधुमाळी सुरू होणार आहे. येत्या आठ -दहा दिवसांत याबाबतच्या सूचना जिल्हा उपनिबंधकांकडे येणार असून, कोल्हापूर जिल्ह्यातील ‘उदयसिंगराव गायकवाड’, ‘इंदिरा सहकारी साखर कारखान्या’सह २२०० हजार संस्था निवडणुकीस पात्र आहेत. सर्वाधिक १६७० दूध व मत्स्य संस्थांचा समावेश आहे.कोरोनापासून सहकारी संस्थांच्या निवडणुका वेळेत झालेल्या नाहीत. ‘गोकुळ’, ‘केडीसीसी’सह इतर प्रमुख संस्थांच्या निवडणुका झाल्या असल्या तरी, इतर छोट्या संस्थांच्या निवडणुका वेगवेगळ्या कारणांनी लांबणीवर पडल्या आहेत. पावसाळ्याचे कारण पुढे करत सप्टेंबरपर्यंत निवडणुकांना स्थगिती दिली. प्रक्रिया सुरू होते, तोपर्यंत विधानसभेची आचारसंहिता लागल्याने निवडणुका थांबवल्या.सोनवडे-बांबवडे (ता. शाहूवाडी) येथील उदयसिंगराव गायकवाड साखर कारखाना व तांबाळे (ता. भुदरगड) येथील इंदिरा महिला सहकारी साखर कारखान्यांची प्रक्रिया सुरू होणार आहे. या कारखान्यांच्या प्रारूप मतदार यादीचे स्थगित केलेले काम पुन्हा सुरू होणार आहे. त्याचबरोबर २२१५ ‘पदुम’ संस्थांपैकी ५४५ संस्थांच्या निवडणुका मागील वर्षभरात झाल्या आहेत. उर्वरित १६७० संस्थांची प्रक्रिया आता राबवली जाणार आहे.येत्या आठ दिवसांत याबाबतचे आदेश जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला प्राप्त होणार असून, त्यानंतर प्रारूप याद्यांसह पुढील प्रक्रिया राबवली जाणार आहे.

दोन महिन्यांत प्रक्रिया पूर्ण करावीच लागेलसहकारी संस्थांप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती) निवडणुकाही होऊ शकलेल्या नाहीत. नवीन सरकारची मानसिकता पाहता मार्चच्या अगोदर निवडणुका घेतल्या जाऊ शकतात. त्यामुळे डिसेंबर व जानेवारी या दोन महिन्यांत बहुतांश सहकारी संस्थांच्या निवडणुका घ्याव्याच लागणार आहेत.

प्राधिकरणाने मागितली शासनाकडे परवानगीचार दिवसांपूर्वीच सहकारी निवडणूक प्राधिकरणाने राज्य शासनाकडे सहकारी संस्थांच्या निवडणुकीसाठी परवानगी मागितली आहे. त्यामुळे नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर लगेचच ही प्रक्रिया सुरू होऊ शकते.

बदलेल्या राजकीय समीकरणाचे परिणामराज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला एकतर्फी बहुमत मिळाल्याने भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदेसेनेचा आत्मविश्वास वाढला आहे. त्याचा गाव पातळीवरील संस्थांसह सर्वच ठिकाणी परिणाम दिसणार आहे.गावपातळीवरील राजकारण तापणारसहकारी संस्थांच्या सत्तेवरच गाव पातळीवरील राजकारण अवलंबून असते. ज्याची संस्थात्मक पकड घट्ट त्याचेच गावावर वर्चस्व असते. त्यामुळे दूध, विकास, पतसंस्थांच्या निवडणूका ताकदीने लढविल्या जातात. ग्रामपंचायतीप्रमाणे इर्षा पहावयास मिळत असल्याने ऐन हिवाळ्यात गावगाड्यातील राजकीय हवा थोडी गरम होणार आहे.प्रवर्गनिहाय अशा होणार निवडणुका

प्रवर्ग    निवडणूक स्थगित संस्था नव्याने पात्र  एकूण
०२-०२
८७४३१३०
२४८१५०३९८
५५९१११११६७०
टॅग्स :kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूक 2024milkदूधSugar factoryसाखर कारखाने