अभय व्हनवाडेरूकडी माणगांव : रूकडी येथील धनगर समाजातील सैन्यदलातील अधिकारी देवेंद्र शिणगारे यांच्यावर जातपंचायतीने बहिष्कार टाकून समाजातून बहिष्कृत केल्याच्या घटनेची खासदार धैर्यशील माने यांनी तात्काळ दखल घेतली. याबाबत काल, सोमवारी (दि ३०) सायकांळी दोन्ही गटाची बैठक घेत जातपंचायतीमधील वादाला मूठमाती दिली. तब्बल पाच तास सुरू असलेली समोपचार बैठक रात्री उशिरा मिटली.खासदार धैर्यशील माने यांच्या जन्मगावी जातपंचायतीने धनगर समाजातील आठ-दहा घरावर सामाजिक बहिष्कार टाकला होता. या कुटूबांतील सदस्यांना मंदिरपूजा, सामाजिक कार्यात सहभाग करून न घेणे. दंडात्माक कारवाई, सामूहीक जमीन कसू न देणे अशा प्रकारे कुटुंबांना वाळीत टाकले होते. या वाळीत टाकलेल्या कुटुंबातील सदस्यच्या बरोबर रोजीरोटीचा व्यवहार करणाऱ्या सैन्यदलातील अधिकारी देवेंद्र शिणगारे यांच्या कुटुंबावर देखील गेली तीन वर्ष बहिष्कार टाकला होता.देवेंद्र शिणगारे हे सैन्यदलात गेले असता मूळगावी असणारे पत्नी यांच्याबरोबर ही समाजातील कोणीही न बोलण्याचा फर्मान सोडण्यात आले होते. सर्व घटना असहाय्य झाल्याने धनगर समाजातील काही कुटुंबानी पोलीस अधिक्षक व हातकणगंले पोलीस स्टेशनकडे तक्रार दाखल केली होती. मात्र यांची दखल घेतील जात नव्हती.खासदार धैर्यशील मानेंनी दोन्ही गटास दरडावलेअखेर खासदार धैर्यशील माने यांनी या घटनेची गंभीर दखल घेत, हातकणगंले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक के.एम पाटील, नायब तहसीलदार दिगबंर सानप, सामाजिक न्याय विभागाच्या नंदिनी जाधव सह धनगर समाजातील दोन्ही गटाची बैठक घेतली. बैठकीस दोन्ही गटाना समोर बसवून दोन्ही गटाचे समुपदेशन केले. समुपदेशन करून दोन्ही गट ऐकण्याचा मनस्थिती नसताना दोन्ही गटास दरडावून असला प्रकार रूकडी गावात खपवून घेतला जाणार नाही असा सूर लावताच दोन्ही गट समझोतावर आला.दोन्ही गटास भंडाऱ्याची शपथसमझोतावर येताच खासदार माने यांनी दोन्ही गटास भंडाराची शपथ घेण्याची व समाजात गुण्यागोविंदाने राहणेबाबत शपथ घेण्याचे आवाहन केले. समाजातील जमिन हिश्यानुसार वाटप, मंदिराचे काम पूर्ण होवू पर्यत काशीनाथ शिणगारे यांना अध्यक्षपद देण्याचे व समाजात सर्वांशी रोजीरोटीचा व्यवहार करण्याचे ठरल्यानंतर सर्वांनी गळाभेट घेवून वादावर पडदा पडल्याचे सर्वांसमक्ष सांगतिले. या बैठकीस सरपंच रफिक कलावंत, उपसंरपच रणजित कदम, तंटामुक्तीचे अध्यक्ष अमोल कुलकर्णी, देवेंद्र शिणगारे, भिकाजी शिणगारे, अनिल बागडी सह समाजातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळालागेली तीन वर्ष कुटुंबाने फार सोसले पण आम्ही माणूसकी सोडली नाही. तीन वर्षात वाईट अनुभव आले. देशसेवेसाठी समर्पित जीवन असताना ही पोलीस विभागाने दखल घेतली नाही हे फार मोठे दुख आहे. माणसांनी माणसाप्रमाणे वागले तरच माणूस म्हणून आपण जगू. झाले गेले गंगेला गेले येथून पुढे आम्ही एकोप्याने राहू अशी मत सैन्यदलातील अधिकारी देवेंद्र शिणगारे यांनी व्यक्त केलं.