कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या फळ मार्केट मध्ये आज, बुधवारी हापूस आंब्याची पहिली पेटी दाखल झाली. आंब्याच्या मुहूर्ताच्या सौद्यात पाच डझनच्या पेटीला तब्बल ४० हजार ५०० रुपये दर मिळाला. समितीचे अशासकीय मंडळाचे अध्यक्ष के. पी. पाटील यांच्या हस्ते सौदा काढण्यात आला. समितीत कोकणातून हापूसच्या तीन पेट्यांची आवक झाली होती. सौद्यामध्ये २८ हजार ५००, ३१ हजार ५०० व ४० हजार ५०० असा दर पेट्यांना मिळाला. या पेट्या गणेश वळंजू, जयवंत वळंजू, सलीम बागवान यांनी खरेदी केल्या. यावेळी अशासकीय मंडळाचे सदस्य, सचिव जयवंत पाटील, उपसचिव राहुल सुर्यवंशी, के. बी. पाटील आदी उपस्थित होते. यावर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे आंबा बागायदाराचे मोठे नुकसान झाले होते. यापावसात आंब्याचा मोहोर गळून पडल्याने यंदा आंबा वेळेत बाजारात येणार का? यांची प्रतिक्षा लागून राहिली होती. मात्र अखेर आज कोकणातून कोल्हापुरात आंब्याची पहिली पेटी दाखल झाली.
'हापूस'च्या पेटीला सोन्याची झळाळी, कोल्हापुरात पहिली पेटी दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2022 6:55 PM