शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
2
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
3
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
4
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
5
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
6
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
7
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
8
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
9
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
10
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
11
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
12
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
13
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
14
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
15
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
16
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
17
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
18
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
19
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
20
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज

दोन वर्षानंतर जोतिबा डोंगरावर घुमला चांगभलंचा गजर, जोतिबाचा पहिला खेटा उत्साहात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 3:31 PM

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे गेले दोन वर्षे बंद असणारे खेटे यात्रा यंदा प्रथमच झाल्याने भाविकांनी मोठी गर्दी केली.

जोतिबा : दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाचा पहिला रविवार खेटा उत्साहात पार पडला. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे गेले दोन वर्षे बंद असणारे खेटे यात्रा यंदा प्रथमच झाल्याने भाविकांनी मोठी गर्दी केली.माघ पौर्णिमापासून सलग पाच रविवार खेटे यात्रा असते. यंदा २० फेब्रुवारी ते २० मार्च दरम्यान खेटे होणार आहेत. कोल्हापूर ते जोतिबा चालत जाऊन रविवार खेटे करण्याची परंपरा आहे. पहिल्या खेटेला येणाऱ्या भाविकांच्या गर्दीमुळे पहाटेपासून मंदिरात पोलीस बंदोबस्त ठेवला होता.कोल्हापूर वडणगे निगवे, कुशिरे गायमुखमार्गे जोतिबा या पारंपारिक मार्गाने चालत भाविकांनी पहिला खेटा पुर्ण केला. पहाटेपासूनच डोंगरावर चांगभलंचा गजर घुमू लागला. पहाटे ४ ते रात्री ११ पर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले होते. रांगेसाठी स्वतंत्र मंडप उभा केला होता. उत्तर दरवाजातून मंदिरात प्रवेश दिला जात होता. दक्षिण दरवाज्यातून भाविक बाहेर पडत होते.चारपैकी दोनच दरवाजे उघडले होते. गर्दीमुळे ई-पास व्यवस्था बंद करण्यात आली. १० वर्षांच्या खालील लहान मुलांना मंदिर प्रवेश दिल्या नसल्याने भाविक संताप व्यक्त करीत होते. पन्हाळा तहसीलदार रमेश शेंडगे यांनी दर्शनरांग व्यवस्था पाहणी केली. कोडोली पोलीस सपोनि शीतल कुमार डोईजड यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त तैनात होता.अभिषेकानंतर प्रवीण कापरे, शिवाजी बनकर, दत्तात्रय धडेल, अशोक धडेल, यांनी पूजा बांधली. उंट, घोडे, पुजारी, देवसेवक, वाजंत्रीच्या लवाजम्यासह धूपारती पालखीचा सोहळा झाला. सकाळी ९ वा. अभिषेक झाला. चांगभलं गजर, गुलाल-खोबऱ्यांची उधळण झाली. बाजारपेठ गर्दीने फुलली होती. एस.टी.बंदमुळे खासगी वाहतूक सुरु होती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर