कोल्हापूर : येथून पुण्याला जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचे सोमवारी (दि.१६) उद्घघाटन होणार असले तरीही आज शनिवारी चाचणीसाठी आलेली ही वंदे भारत सकाळी १० वाजून २५ मिनिटांनी पुण्याला रवाना झाली. सोमवारी दुपारी सव्वा चार वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सोमण्णा यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीमध्ये या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे.हा कार्यक्रम निश्चित झाल्यामुळे शनिवारी चाचणी घेण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. त्यानुसार सकाळीच भगव्या रंगाची वंदे भारत कोल्हापुरात दाखल झाली. यानंतर १० वाजून २५ मिनिटांनी ती पुण्याला रवाना झाला.
हे ही वाचा- कोल्हापूर, सांगलीसाठी खूशखबर; दोन स्वतंत्र ‘वंदे भारत’ धावणार, जाणून घ्या वेळापत्रकयावेळी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी इंदूराणी दुबे, ब्रिजेश सिंह, मिलिंद हिरवे, डॉ. रामदास भिसे, विकास श्रीवास्तव, महेश्वरी, कोल्हापूर स्टेशन प्रबंधक मेहता, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी उपस्थित होते. या एक्सप्रेसबद्दल छत्रपती शाहू महाराज रेल्वे टर्मिनसवरील प्रवाशांनाही मोठी उत्सुकता होती.