शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

स्वातंत्र्यलढ्याचा पहिला हुंकार कोल्हापुरातील शिवाजी पेठेतून, बावडेकर आखाडा होता केंद्रस्थानी 

By संदीप आडनाईक | Published: August 16, 2024 11:50 AM

भूमिगत सैनिकांना मिळे आसरा

संदीप आडनाईककोल्हापूर : स्वातंत्र्य मिळून आज भारताला ७८ वर्षे पूर्ण झाली; परंतु त्यासाठी लढणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या आणि ठिकाणांच्या आठवणी आजही ताज्या आहेत. कोल्हापुरातही १९२४ पासूनच स्वातंत्र्यलढ्याची ठिणगी पडली होती. या स्वातंत्र्यलढ्याचा पहिला हुंकार शिवाजी पेठेतून निघाला. येथील पंत अमात्य बावडेकर आखाडा या चळवळीच्या केंद्रस्थानी होता. अनेक भूमिगत स्वातंत्र्यसैनिकांचे ते आश्रयस्थान ठरले.

महात्मा गांधी यांची चळवळ १९२४ मध्ये सुरू झाली. याचे पहिले सत्याग्रही गोपाळ मेथे होते. कोल्हापुरात चरखा संघ आणि खादी उत्पादन संघ स्थापन करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. स्वदेशी चळवळ, परदेशी कापडाची होळी, झेंडा सत्याग्रह अशी चळवळ सुरू झाली. त्यात कटकोळे, कट्टी आणि इतर कार्यकर्ते सहभागी होते. १९२७ मध्ये महात्मा गांधी कोल्हापुरात आले. त्यांनी तपोवन येथे चरखा संघाच्या इमारतीची पायाभरणी केली.यावेळी सत्यशोधक चळवळीतील वासुदेवराव तोफखाने, गोपाळ मेथे, खंडेराव बागल, कटकोळ आदी कार्यकर्ते राष्ट्रीय चळवळीत आले. १९३९ मध्ये भाई माधवराव बागल यांनी शेतकऱ्यांचा मोर्चा काढला, त्यात माधवराव भोसले सहभागी झाले होते. ते शिवाजी पेठेतील. त्यांच्यामुळे अनेक सहकारी या चळवळीत ओढले गेले. तेथेच राष्ट्रसेवा दलाची शाखा त्यांनी सुरू केली.बावडेकर वाड्याच्या पलीकडील झाडीत चळवळीतील ज्येष्ठांच्या सभा व्हायच्या. पहिलवान भीमराव जाधव, श्रीराम चिंचलीकर, हरिभाऊ धर्माधिकारी, नाना धर्माधिकारी, प्रभाकर कोरगावकर येत. पुढे बावडेकर तालीम, वरुणतीर्थ तलावाच्या पश्चिमेस साळोखे हे शारीरिक शिक्षण आणि बौद्धिक घेऊ लागले. उभा मारुती चौकात श्रीपती चव्हाण, पत्नी बायनाबाई चव्हाण, मुलगी सुशीलाबाई, निवृती आडूरकर सूत कातत असत.कोल्हापूरसह सातारा, सांगली, तसेच अन्य जिल्ह्यांतील स्वातंत्र्यसैनिक भूमिगत होऊन पंत अमात्य बावडेकर आखाड्यात मुक्कामाला असायचे. या तालमीतूनच संदेश दिले जायचे. बैठकीतून पुढील आंदोलनाची दिशा ठरविली जायची.

पहिली प्रभातफेरी पेठेत१९४१ मध्ये महायुद्ध झाले. सैन्यात भरती करण्यासाठी ब्रिटिश प्रचार करत होते. त्याला विद्यार्थी संघटनांचा विरोध होता. कोल्हापुरात बापू पाटील यांनी प्रभात फेरी काढण्याची जबाबदारी अण्णासाहेब चव्हाण यांच्यावर सोपवली. ३० जानेवारी आणि १४ नोव्हेंबरला पहिली प्रभात फेरी निघाली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरIndependence Dayस्वातंत्र्य दिन