शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्याकडे महाराष्ट्राचे सत्यात उतरणारे स्वप्न, माझा कम्फर्ट भाजपसोबत; राज ठाकरेंनी मांडली रोखठोक भूमिका
2
मराठा समाजाची कांड्यांवर मोजण्याइतकी आहेत मतं; भाजपच्या बबनराव लोणीकरांचे वादग्रस्त वक्तव्य
3
शिवाजी पार्कवर उद्धवसेना, मनसेची सभा होणार?; नगरविकास खात्याच्या निर्णयाकडे लक्ष
4
जगातले दुश्मन एकत्र येतात तर आम्ही एकत्र येण्यावर चर्चा तर हवी; 'लोकमत'च्या मुलाखतीत राज ठाकरेंचं वक्तव्य
5
भाजपच्या बंडखोर उमेदवाराचा शिंदेसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा
6
उठा उठा थंडी आली, स्वेटर घालायची वेळ झाली; मुंबई २० अंशांवर, राज्यात थंडीचा कडाका होतोय सुरू!
7
२० वर्षांत मतदार नेमके कुणाकडे गेले? २००४ ते २०१९ मध्ये काय घडलं?; जाणून घ्या आकडेवारी
8
२ हजारांहून अधिक मतदार सध्या कामानिमित्त परदेशात
9
दिव्यांग, ज्येष्ठांना मतदानाला आणण्यासाठी विशेष सोय; सक्षम ॲपवर नाव नोंदवण्याचे आवाहन
10
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

Kolhapur: येत्या विधानसभेला कागलमध्ये 'मविआ'तील माजी आमदार महायुतीच्या उमेदवाराला मदत करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2024 12:02 PM

मागील विधानसभा निवडणुकीत संभाजी भिडे गुरुजी हे देवेंद्र फडणवीस यांचा निरोप घेऊन आले होते की..

साके : आमचा भाजपला विरोध आहे,परंतु मंत्री हसन मुश्रीफ यांना नाही. जनसामान्यांचा विकास पाहिजे आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांना मदत करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, असे प्रतिपादन माजी आमदार संजय घाटगे यांनी केले. साके, ता. कागल येथील विविध विकासकामांच्या लोकार्पण व उदघाटन कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. पालकमंत्री हसन मुश्रीफ, गोकुळचे संचालक अंबरिष घाटगे उपस्थित होते.संजय घाटगे म्हणाले, गत विधानसभा निवडणुकीत मी मुश्रीफांकडून पैसे घेऊन निवडणूक लढवल्याचे काही लोकांनी आरोप केले. हसन मुश्रीफ तुम्ही शपथ घेऊन सांगा की एक रुपयाही तुम्ही मला दिला आहे काय? आणि दिला तरीही तो मी घेणार नाही. मागील विधानसभा निवडणुकीत संभाजी भिडे गुरुजी हे देवेंद्र फडणवीस यांचा निरोप घेऊन आले होते की, तुम्ही माघार घ्या, तुम्हाला विधानपरिषदेचे आमदार करतो. पण उद्धव ठाकरे यांनी मला विश्वासाने उमेदवारी दिली होती. त्यांचा विश्वासघात करून मला विधान परिषदेचे आमदार काय कोणतेच पद नको.हसन मुश्रीफ म्हणाले, संजय घाटगे यांनी घेतलेल्या निर्णयाचे मी स्वागत करतो. त्यांनी निवडणूक लढवायला पाहिजे होती. परंतु त्यांनी यापूर्वीच निवडणूक न लढविण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे त्यांची अडचण मी समजू शकतो. मी संजय घाटगे यांना कोणत्याही निवडणुकीत एक रूपायाही कधी दिला नाही हे शपथपूर्वक सांगतो.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkagal-acकागलPoliticsराजकारणHasan Mushrifहसन मुश्रीफvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक 2024