राम मगदूमगडहिंग्लज : राष्ट्रीय नेते शरद पवार यांचे नेतृत्व मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला गडहिंग्लज तालुक्यातून प्रचंड मताधिक्य दिले. परंतु, कुटुंबप्रमुख या नात्याने सर्वांना बरोबर घेवून काम करण्याऐवजी विजयासाठी कष्ट घेतलेल्यांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे ‘चंदगड’चा भावी आमदार स्व. कुपेकरांचे कार्यकर्तेच ठरवतील, असा सूचक इशारा माजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी नामोल्लेख टाळून आमदार राजेश पाटील यांना दिला.मनवाड येथे नळपाणी पुरवठा योजना कामाच्या प्रारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. हत्तरकीच्या कारिमठाचे मठाधिपती श्री गुरूसिद्धेश्वर महास्वामीजी, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार अरूण लाड यांच्या सहकार्याने बांधलेल्या रंगमंच, स्वच्छतागृह व सौरऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पणही मान्यवरांच्याहस्ते झाले.महास्वामीजी म्हणाले, स्व. कुपेकर यांनी गडहिंग्लजचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करणाºया कार्यकर्त्यांमुळेच मनवाडच्या विकासाला दिशा मिळाली आहे.यावेळी जिल्हा मजूर फेडरेशनचे माजी अध्यक्ष उदय जोशी, ‘मनसे’ जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, शिवसेना ठाकरे गटाचे रियाजभाई शमनजी, काँगे्रसचे सरचिटणीस विद्याधर गुरबे यांचीही भाषणे झाली.कार्यक्रमास उपसरपंच वैभवी लोखंडे, येणेचवंडीच्या सरपंच दीपाली कांबळे, हिडदुगीचे उपसरपंच विक्रांत नाईक, शंकर कांबळे, सतीश थोरात, तानाजी कुराडे, अजित पाटील, संभाजी पाटील आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. तंटामुक्त समिती अध्यक्ष राकेश पाटील यांनी स्वागत केले. सरपंच ज्ञानप्रकाश रेडेकर यांनी प्रास्ताविक केले. रावसाहेब पाटील यांनी सूत्रसंचलन केले. ग्रामसेवक विजय जाधव यांनी आभार मानले.
Kolhapur: ‘चंदगड’चा भावी आमदार कुपेकरांचे कार्यकर्तेच ठरवणार, संध्यादेवी कुपेकरांचा आमदार राजेश पाटलांना इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2023 5:45 PM