शहरं
Join us  
Trending Stories
1
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
2
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
3
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
4
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
5
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
6
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
7
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
8
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने गाठला दिवाळीचा मुहुर्त, घरी आणली नवी कोरी मर्सिडीज
9
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
10
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
11
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
12
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
13
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
14
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
15
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
16
राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘गॅरंटी कार्ड’ही फ्लॉप होणार : देवेंद्र फडणवीस 
17
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
18
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
19
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
20
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत

गुंतवणूकदारांना कोट्यवधीचा गंडा घालणाऱ्या लोहितसिंगला वाचवण्यासाठी बड्या नेत्याच्या मुलाची मदत, मोबाइल संभाषण व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2023 11:58 AM

लोहितसिंगकडून ९५ लाख रुपये उकळल्याची चर्चा 

कोल्हापूर : एएस ट्रेडर्सचा प्रमुख लोहितसिंग सुभेदार याला वाचवण्यासाठी एका बड्या नेत्याच्या मुलाने मदत केल्याचे मोबाइल संभाषण सोशल मीडियात व्हायरल झाले आहे. यात संबंधित मुलाने लोहितसिंगकडून ९५ लाख रुपये उकळल्याचीही चर्चा आहे. याबाबत पोलिसांनी काय तपास केला? याची उत्सुकता वाढली आहे.एएस ट्रेडर्सच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणारा अटकेतील मुख्य सूत्रधार लोहितसिंग धर्मासिंग सुभेदार (रा. पलूस, जि. सांगली) याच्या पोलिस कोठडीची मुदत मंगळवारी (दि. ३) संपली. कोठडीतील चौकशीदरम्यान त्याच्याकडून खंडणी उकळणाऱ्या खंडणी बहाद्दरांची नावे पोलिसांना मिळाली असून, काही मुद्देमाल जप्त करण्यातही पोलिसांना यश आले आहे. कोठडीची मुदत संपल्यानंतर लोहितसिंगचा ताबा लोणावळा पोलिसांकडे देण्यात आला.गुंतवणूकदारांना कमी कालावधीत मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून एएस ट्रेडर्स कंपनीने मोठा गंडा घातला. या फसवणुकीचा मुख्य सूत्रधार लोहितसिंग सुभेदार याच्या अटकेनंतर फसवणुकीची नेमकी व्याप्ती स्पष्ट झाली. त्याच्या चौकशीत महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे, तसेच काही मुद्देमालही पोलिसांनी जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.अन्य साथीदारांकडे असलेल्या रकमा, त्यांच्याकडील गुंतवणूकदारांची संख्या, एजंटना दिलेले कमिशन, खरेदी केलेल्या महागड्या वस्तू, खंडणीसाठी दबाव टाकणाऱ्या खंडणी बहाद्दरांचीही नावे पोलिसांना मिळाली आहेत. यात राजकीय पक्षांशी संबंधित असलेल्या काही कार्यकर्त्यांचाही समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईकडे गुंतवणूकदारांच्या नजरा लागल्या आहेत.

लोणावळा पोलिसांच्या कोठडीत रवानगीकोल्हापूर पोलिसांच्या कोठडीतील मुदत संपल्याने लोणावळा पोलिसांनी लोहितसिंगचा ताबा घेतला. त्याच्या विरोधात लोणावळ्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. तिथेही काही गुंतवणूकदारांना त्याने कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस