कोल्हापूर : येथील मध्यवर्ती शासकीय इमारतीमधील बहुतांशी शासकीय कार्यालयांचे कुलूप मंगळवारी दहा नंतरच उघडले. सलग तीन दिवसांची सुट्टी घेऊन आलेले अधिकारी, कर्मचारी निवांत ११ पर्यंत येत राहिले. परिणामी कामानिमित्त आलेल्यांना बाहेर ताटकळत उभे राहावे लागले. यामुळे शासकीय कार्यालयात कधीही या आणि कधीही जा, असे चित्र बायोमेट्रिक हजेरीच्या जमान्यात ही कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.कसबा बावडा येथील मध्यवर्ती शासकीय इमारतीमध्ये अनेक शासकीय कार्यालये आहेत. त्या इमारतीमधील कार्यालयात शासकीय अधिकारी, कर्मचारी वेळेत येतात की नाही, याची पाहणी लोकमत'ने मंगळवारी केली. नियमानुसार शासकीय कार्यालय ९.३० वाजता उघडणे आणि कर्मचारी अधिकाऱ्यांनी ९ वाजून ४५ मिनिटांपर्यंत येणे बंधनकारक आहे. पण पाहणीत या नियमाला अनेकांनी सर्रास केराची टोपली दाखवल्याचे समोर आले.
कोल्हापुरात शासकीय कार्यालयाचे कुलूप उघडते दहानंतरच, अधिकारीही वेळेत येत नसल्याचे चित्र
By भीमगोंड देसाई | Published: September 06, 2022 6:21 PM