शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

काळा दिन: सीमाभागातील मराठी बांधवांनी निर्णायक लढ्यासाठी तयार रहावे, प्रा अच्युत मानेंचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2022 3:47 PM

लोकशाही मार्गाने व शांततेच्या मार्गाने करत असलेल्या आंदोलनाला कर्नाटक पोलीस मात्र दडपशाहीची भूमिका घेत आहेत.

निपाणी : गेल्या साठ वर्षांपेक्षा जास्त काळापासून सीमाभागातील मराठी भाषिक अन्याय सहन करत आहे. लोकशाही मार्गाने व शांततेच्या मार्गाने करत असलेल्या आंदोलनाला कर्नाटक पोलीस मात्र दडपशाहीची भूमिका घेत आहेत. यामुळे आता सीमाभागातील मराठी भाषिकांनी निर्णायक लढ्याची तयारी ठेवण्याची गरज आहे. त्याचबरोबर या पुढचा लढा हा अधिक सक्षमपणे लढण्यात यावा यासाठी मराठी भाषिकांनी व नवीन पिढीने यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रा. अच्युत माने यांनी केले.निपाणी भाग मराठीकरण समिती, शिवसेना. म ए युवा समिती व समस्त मराठी भाषकांच्यावतीने निपाणी येथे काळा दिनानिमित्त निषेध सभा आयोजित करण्यात आली होती.  यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर म ए समितीचे जयराम मिरजकर, प्रा एन आय खोत, शिवसेना जिल्हाप्रमुख बाबासाहेब खांबे, युवा समिती कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत पाटील, प्रा भारत पाटील, राजेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते.माने पुढे म्हणाले की, सीमाप्रश्नाचा हा लढा सर्वाधिक जुना व कायदेशीर व न्यायालयीन मार्गाने लढला जात आहे. या साठ वर्षाच्या काळात कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातील लोकप्रतिनिधींकडून आश्वासनांची खैरात केली जाते. यापलीकडे सीमा वासियांसाठी काही केले जात नाही. आज निपाणी पोलीस प्रशासन मराठी भाषिकांवर दडपशाही करत आहे. यापूर्वी रस्त्यावरील लढाईला परवानगी होती.  आता बंद दाराआड चळवळीची सभा घेतली जात आहे. रस्त्यावर उतरला तर अटक करू अशा धमक्या हे प्रशासन देत आहे. यामुळे आता मराठी भाषिकांनी याचा विचार करून संघर्ष केला पाहिजे.जयराम मिरजकर म्हणाले की, भाषावर प्रांत रचना होताना बहुसंख्य मराठी भाषिक असलेला हा भाग मात्र कर्नाटकात डांबण्यात आला. पण आता न्यायालयाच्या अंतिम प्रक्रियेत हा प्रश्न असल्याने लवकरच हा प्रश्न सुटणार आहे. निपाणी येथील प्रशासन व्यापारी व मराठी भाषिकांवर दबाव आणत आहे. हे प्रशासनाने न करता आमचा आंदोलन करण्याचा घटनेने दिलेला हक्क येथील मराठी भाषिकांना द्यायला पाहिजे.बाबासाहेब खांबे म्हणाले की, एक नोव्हेंबर रोजी परंपरेने काळा दिन पाळून रस्त्यावर आंदोलन करण्याची आमची तयारी होती पण पोलीस प्रशासनाने आदल्या दिवशी उशिरा रात्रीपर्यंत आम्हाला परवानगी नाकारली. रस्त्यावर उतरला तर अटक करू अशी धमकी दिली व त्याचबरोबर वारंवार विनंती केल्यानंतर बंद दाराआड निषेध करण्याचे सांगितले. या कार्यक्रमाला नवनाथ चव्हाण, स्वरूप परीट, नंदकुमार कांबळे, बाबासाहेब मगदूम, प्रकाश इंगवले यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित राहिले होते. रहेंगे तो महाराष्ट्र मे, नही तो जेल मे...या कार्यक्रमात रहेंगे तो महाराष्ट्र मे, नही तो जेल मे... निपाणी बिदर भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरKarnatakकर्नाटक