शहरं
Join us  
Trending Stories
1
रस्त्याच्या कामासाठी लावलेलं लोखंडी बॅरिकेड वृद्ध महिलेवर कोसळलं, थरारक व्हिडिओ व्हायरल!  
2
जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ठरले जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, मिळाला मोठा सन्मान!
3
खासदार विशाल पाटलांना भाजपकडून ऑफर, चंद्रकांत पाटील म्हणाले, "एक चांगला माणूस यावा, यासाठी..."
4
Palmistry: तळहाताच्या 'या' उंचवट्यावर तीळ, हे तर राजयोग प्राप्त होण्याचे लक्षण!
5
कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी रिकव्हरी एजंट घरी येऊ शकतात का? काय सांगतो कायदा
6
मुंबईविरुद्ध सामन्यात चेन्नईचे खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात का उतरले? जाणून घ्या कारण
7
लग्नाच्या वरातीवर काळाचा घाला, दरीत कोसळली गाडी; ६ जणांचा मृत्यू, वधू-वर गंभीर जखमी
8
Swapna Shastra: स्वप्नात 'या' गोष्टींचे दिसणे म्हणजे वर्षाखेरीपर्यंत संसाराला लागणार याची चिन्हं!
9
डॉ. वळसंगकर प्रकरणाला नवं वळण? आरोपी मनीषा हिला होती वळसंगकर कुटुंबातील वादाबाबत त्या गोष्टींची माहिती 
10
"कुठल्याही भाषेला विरोध नाही पण...", मनसेच्या हिंदी भाषा सक्ती विरोधानंतर मराठी अभिनेत्री स्पष्टच बोलली
11
ट्रम्प यांचं एक वक्तव्य गुंतवणूकदारांना भोवलं? अमेरिकन बाजार आपटला; डॉलरही घसरला
12
रेस्टॉरंट वेटर ते क्रिकेट अंपायर...! IPL मध्ये दिसणारा हा मराठमोळा पंच कोण आहे?
13
नाना पाटेकर घटस्फोट न घेताच पत्नीपासून राहतात वेगळे, यामागचं कारण आलं समोर
14
"मम्मी-पपा, मी आत्महत्या करतोय, यात तुमची काही चूक नाही"; 18 वर्षाच्या विद्यार्थ्याने संपवलं आयुष्य
15
अमृतपाल समर्थकांनी अमित शहांसह अनेक नेत्यांवर हल्ला करण्याचा कट रचला; चॅटमधून मोठा खुलासा
16
बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटीची मागणी, सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी!
17
Zeeshan Siddique: '१० कोटी दे नाहीतर तुला वडिलांसारखे मारून टाकीन'; झीशान सिद्दीकी यांना डी कंपनीकडून धमकी
18
अभिनेता टायगर श्रॉफच्या हत्येसाठी २ लाखाची सुपारी दिल्याचा दावा; एकावर गुन्हा दाखल
19
ट्रम्प टॅरिफचा फटका अमेरिकन कंपनीलाच? अ‍ॅपलनंतर गुगलने घेतला मोठा निर्णय
20
रोहित पवारांना आणखी एक धक्का: नगरपालिका हातातून निसटली; कर्जतचा नवा नगराध्यक्ष कोण?

Kolhapur: नागपूर-रत्नागिरी महामार्ग एक वर्षे मृत्यूचा सापळाच, यावर्षीच पूर्ण करण्याची होती मुदत

By भीमगोंड देसाई | Updated: March 24, 2025 15:37 IST

काम संथ गतीने : पुढील वर्षापर्यंत मुदतवाढ मिळाल्याने बाधित ग्रामस्थ बेजार

भीमगोंडा देसाई कोल्हापूर : जिल्ह्यातील नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाची मुदत यंदा संपली तरी काम पूर्ण होणार नसल्याने पुन्हा एक वर्षाची म्हणजे २०२६ पर्यंत ठेकेदार कंपनीस मुदतवाढ मिळाली आहे. रस्त्याचे काम सुरू असल्याने मूळ रस्ता अनेक ठिकाणी खोदला आहे. भरावा टाकला आहे. परिणामी अपघातांमुळे वाहनधारकांसाठी रस्ता मृत्यूचा सापळाच बनला आहे. आणखी एक वर्ष अशीच स्थिती राहणार आहे. आता रस्त्याच्या दोन्ही बाजूचे रहिवासी, वाहनधारकांचा श्वास धुळीने कोंडत आहे. पावसाळ्यात रस्त्यांवरील चिखलातून सर्कस करीत वाहने चालवावी लागणार आहेत.नागपूर - रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ या १३४ किलोमीटर रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सन २०२३ पासून केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील चोकाक ते आंब्यापर्यंत पूर्वी असलेल्या रस्त्यावरील सर्व तीव्र वळणे, चढ-उतार काढले आहेत. मलकापूर, शाहूवाडीसह अनेक गावांना बायपास करून रस्ता होत आहे. शक्य तितका रस्ता सरळ केला आहे. यामुळे करवीर, पन्हाळा, शाहूवाडी तालुक्यातील लहान-मोठे डोंगर फोडले जात आहेत. नवीन रस्त्यावर भरावा, बांधकाम, उड्डाण पूल बांधणे अशी कामे केली जात आहेत.

पन्हाळा, शाहूवाडीत पावसाळ्यात प्रचंड पाऊस असल्याने काम करण्यास त्याचा व्यत्यय येत आहे. कामाला गती देता आलेली नाही. काम केले जात असतानाही अनेक ठिकाणी पूर्वीच्या रस्त्यावरून वाहतूक सुरू आहे. हा रस्ता नांगरलेल्या शेतासारखा आहे. काही ठिकाणी नवीन काँक्रीटचा रस्ता तयार झाला आहे. वाहनधारकांना काँक्रीटच्या आणि खड्डेमय रस्त्यावरून वाहने चालवावी लागत आहेत.काँक्रीटच्या रस्त्यावर कारसारखी हलकी वाहने आल्यानंतर ती शंभरच्या गतीने जातात. अवजड वाहने ८० च्या स्पीडने जातात. काही अंतरानंतर पुन्हा खराब, माती टाकून केलेला रस्ता लागतो. यामुळे वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत. दरम्यान, गतीने काम झाले असते तर या वर्षीच वाहनधारकांची यातून सुटका झाली असती; पण काम अपेक्षित गतीने न झाल्याने पुढील एक वर्ष तरी या मार्गावरून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागणार आहे.दृष्टिक्षेपातील महामार्ग..

  • रत्नागिरी ते चोकाक : १३४.०६९ किलोमीटर
  • पहिला टप्पा मिऱ्या बंदर ते आंबा : ५५.९०९ कि.मी.
  • दुसरा टप्पा आंबा ते पैजारवाडी : ४५.२०० कि. मी.
  • तिसरा टप्पा पैजारवाडी ते चोकाक : ३२.९६० कि. मी.
  • रुंदी : ४५ मीटर
  • मंजूर निधी : ५६९८.६४ कोटी
  • कोल्हापूर - आंबा : ३९२४.६१ कोटींची तरतूद
  • जिल्ह्यातील बाधित गावे : ४९
  • जमीन संपादित झालेले शेतकरी : १२ हजार ६०८
  • जमीन मोबदल्यासाठी तरतूद : १ हजार २५ कोटी

कोल्हापूर शहराला बायपास; पण..सांगली जिल्ह्यातून कोल्हापूर जिल्ह्यात हा महामार्ग अंकली चोकाक - हेर्ले, शिये- भुये- केर्लेे असा येतो. कोल्हापूर शहरातून हा रस्ता बायपास झाला आहे. शियेजवळ पुणे - बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गातून क्रॉसिंग होणार आहे. शियेपासून केर्लेपर्यंतच्या कामाला गती नाही. पिकाऊ काळ्या जमिनीतून हा रस्ता जात आहे. हा रस्ता लवकर पूर्ण होत नसल्याने दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे.

भूसंपादनास विरोधामुळे कामाचा श्रीगणेशाच नाही ..महामार्गासाठी ९०७ किलोमीटरचे भूसंपादन बाजारभावाच्या चारपट मूल्यांकनाने झाल्याने शेतकऱ्यांनी जमीन देण्यास विरोध केला नाही; पण चोकाक ते अंकलीपर्यंतच्या ३८ किलोमीटरपर्यंतच्या रस्त्यासाठीच्या जमिनीला रेडीरेकनरच्या दुप्पट भाव मिळणार असल्याने बाधित शेतकरी जमीन देण्यास तयार नाहीत. बाधित शेतकऱ्यांनी संघटितपणे जमीन संपादनाची प्रक्रिया हाणून पाडली आहे. जमीन संपादित झाली नसल्याने महामार्गाच्या कामाचा अजून श्रीगणेशाही झालेला नाही.

मिऱ्या बंदर ते चोकाकपर्यंत तीन टप्प्यांत काम होत आहे. मिऱ्या बंदर ते आंबापर्यंतचे काम ७५ टक्के पूर्ण झाले आहे. तेथून पुढील काम जमीन संपादनासह अनेक अडचणींमुळे ५० टक्केच झाले आहे. काम पूर्ण करण्यास एक वर्षाची मुदवाढ मिळाली आहे.  - गोविंद, प्रकल्प उपव्यवस्थापक, नागपूर - रत्नागिरी महामार्ग, कोल्हापूर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRatnagiriरत्नागिरीnagpurनागपूरhighwayमहामार्ग