शहरं
Join us  
Trending Stories
1
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
2
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
3
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
4
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
5
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
6
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
7
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
8
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
9
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
10
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
11
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
12
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
13
'भाऊ बोलून गळा पकडायचा!' अंकिताने सूरजला केलं टार्गेट, DP चांगलाच भडकला! प्रोमो बघाच
14
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
15
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
16
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
17
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
18
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
19
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
20
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी

पुनर्विवाहाने 'विधवां'च्या आयुष्यात पुन्हा भरले रंग, कोल्हापुरात पडले पुढचे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2022 1:30 PM

विधवा पुनर्विवाह हे परंपरांचे जोखड आता कमी होऊ लागल्याचे आणि सामाजिक बदलांचे द्योतक आहे.

इंदुमती गणेशकोल्हापूर : तिचं वय अवघे २५ वर्षे. पदरात लहान मूल... सुखी संसार सुरू असताना कोरोनाने पतीचे निधन झाले. दुसऱ्या घटनेत अपघाताने तिचे कुंकू पुसले. तिसरी घटना सीमेवर शहीद झालेल्या जवानानंतर तिच्या सुखांनाही तिलांजली मिळाली.... पण हे दु:ख आयुष्यभर तिने कवटाळून बसण्यापेक्षा पुनर्विवाहाने विधवेच्या आयुष्यात पुन्हा आनंदाचे रंग भरले आहेत. गेल्या काही महिन्यांत जिल्ह्यात झालेले विधवा पुनर्विवाह हे परंपरांचे जोखड आता कमी होऊ लागल्याचे आणि सामाजिक बदलांचे द्योतक आहे.

म्हसवे (ता. भुदरगड) येथील स्वाती यांच्या पतीचे कोरोनाने निधन झाल्यावर दिराने बाळासह त्यांचा स्वीकार केला. कोरोना, शहीद जवान, अपघाती मृत्यू अशा कोणत्याही कारणाने वैधव्य आलेल्या तरुणींचे विवाह होण्याचे प्रमाण सुदैवाने आता वाढले आहे. ‘विधवेचे लग्न’ हे शब्द उच्चारणेही जिथे गुन्हा वाटायचा, त्या रूढीबंदिस्त मानसिकतेत सकारात्मक बदल घडून आता पुन्हा एकदा तिची लग्नगाठ बांधली जात आहे.कोल्हापुरात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी विधवा पुनर्विवाहासाठी तसेच आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाहाला प्रोत्साहन दिले होते. त्यांच्या मुलांना अधिकार मिळावेत यासाठी कायदा केला होता. आताच्या पुढारलेल्या समाजमानसात अजूनही विधवा पुनर्विवाहाचा विषय फारसा रुजलेला नाही. त्यात तिला मूल असेल तर आपल्या मुलाचा वारस रहावा म्हणून कुटुंबीयांची देखील विधवेचे लग्न लावून देण्याची तयारी नसते; पण दोन वर्षांपूर्वी आलेल्या कोरोनाने क्षणभंगूर आयुष्य दाखवून दिले.

त्याकाळात विशेषत: दुसऱ्या लाटेत १८ ते ४५ वयोगटातील पुरुषांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक होते. त्यामुळे कित्येक मुली-महिलांना विवाहानंतर तीन वर्षांच्या आतच वैधव्य आले आहे अशा विधवांच्या विवाहासाठी आता समाज पुढे येत आहे.मानसिक दडपणपुनर्विवाहाचा विचार आला तरी विधवा महिलांवर आपण अप्रामाणिकपणा करतोय की काय अशी अपराधी भावना असते. कुटुंबीयांचीदेखील तिचे दुसरे लग्न लावून देण्याची तयारी नसते. ग्रामीण भागात मुलींचे लग्न १८-१९ व्या वर्षीच होते. ती २५ वर्षांपर्यंत एक-दोन बाळांची आई झालेली असते. त्यात मूल मोठे असेल तर पुनर्विवाहाचा विषयच काढला जात नाही.कौटुंबिक नव्हे, सामाजिक प्रश्नस्त्रीयांच्या तुलनेत पुरुषांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे समाजात विधवा महिलांची संख्या मोठी आहे. तरीही या विषयाकडे सामाजिक प्रश्न म्हणून नव्हे, तर कौटुंबिक विषय म्हणून पाहिले जाते. अशा स्त्रीने शिक्षण घ्यावे, आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे, तिला पुन्हा पती मिळावा, सुखी संसाराचे सुख मिळावे, हक्काचे कुटुंब मिळावे यासाठी प्रयत्नांची गरज आहे.ही आहे परिस्थितीशासकीय अहवालानुसार कोरोना मृत्यूपैकी २२ टक्के मृत्यू हे ५० पेक्षा कमी वयोगटातील पुरुषांचे आहेत. राज्यात एकूण दीड लाख लोकांचा मृत्यू झाला. त्यापैकी ६० टक्के मृत्यू पुुरुषांचे झाले असे धरले तरी ८० ते ९० हजार पुरुषांचे निधन झाले.

विधवा पुनर्विवाहाचे प्रमाण वाढले असले तरी त्याबाबत खूप काम करावे लागणार आहे. विधवांना पुन्हा संसार सुख मिळावे यासाठी चळवळ सुरू केली आहे. अहमदनगर, कोल्हापूरमध्ये प्रत्येकी दोन, यवतमाळ, नाशिकमध्येदेखील असे विवाह झाले आहेत ही समाधानाची बाब आहे. कोरोनामुळे विधवा झालेल्या किमान १०० महिलांचे पुनर्विवाह व्हावे असे आमचे प्रयत्न आहेत. - हेरंब कुलकर्णी, कोरोना एकल महिला पुनर्वसन समिती महाराष्ट्र

टॅग्स :kolhapurकोल्हापूर