शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात तब्बल ७,९९५ उमेदवार, सर्वच पक्षांत बंडखोरही भारंभार, १०,९०५ उमेदवारी अर्ज दाखल
2
घर फोडायचे पाप आई-वडिलांनी शिकवले नाही; शरद पवार यांची अजित पवार यांच्यावर टीका
3
आजचे राशीभविष्य: ७ राशींना आनंदी दिवस, लाभाचे योग; कार्यात यश, चांगली बातमी मिळेल
4
पोलिस-वकिलांमध्ये कोर्टातच हाणामारी; ११ वकील जखमी, पोलिस ठाण्याला आग
5
कुणाकडून कोण रिंगणात... घोळ मिटेना! जागावाटपाचा सस्पेन्स कायम; आता माघारीवर नेत्यांमध्ये होणार घमासान
6
आबांनी माझा केसाने गळा कापण्याचा प्रयत्न केला : अजित पवार
7
इस्रायलच्या हल्ल्यात गाझामध्ये ६० जण ठार; मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचे प्रमाण अधिक
8
कॅनडात टेस्ला कारचा अपघातामुळे स्फोट; नाशिकचा युवक ठार, डीएनएवरून पटली ओळख 
9
कोकण रेल्वेच्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल; १ नोव्हेंबरपासून होणार अमंलबजावणी
10
अयोध्येत ५५ घाटांवर २८ लाख दिवे लागणार, ऐतिहासिक दीपोत्सवाचा मोठा उत्साह
11
जर्मनी, जपानमध्ये आजही का होतात बॉम्बस्फोट?
12
फक्त गणना की जातगणना? सध्या औत्सुक्याचा विषय, पण उत्तर लवकरच मिळेल 
13
सरकारकडून लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न, प्रियांका गांधी यांचा प्रचारसभेत आरोप
14
भारत-चीन सैन्य मागे घेण्यास तयार, पूर्व लडाखमध्ये डेमचोक आणि डेपसांगवर तोडगा अंतिम टप्प्यात 
15
निदान कुलगुरुंना तरी राजकारणापासून दूर असू द्या !
16
ढोंगी लोकांच्या भुलाव्याला आपण का फसत गेलो?
17
नायजेरियन्सच्या ड्रग्ज पार्टीवर छापा, २६ लाख ७७ हजाराचे एमडी हस्तगत; २० नायजेरियनवर गुन्हा दाखल
18
हिवाळ्यात मुंबईतून रोज ९६४ विमानांच्या फेऱ्या
19
बी. फार्मसीच्या प्रवेशाला आचारसंहितेचा फटका, महाविद्यालयांची मान्यता प्रक्रिया रखडल्याने प्रक्रिया स्थगित
20
उलवेतून १ कोटीचे कोकेन हस्तगत, आफ्रिकन व्यक्तीला अटक

एनआयएने कोल्हापुरातून ताब्यात घेतलेल्या संशयिताला नेले मुंबईला, यापूर्वीही त्याच्यावर होता गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 5:52 PM

संशयिताने काही वर्षांपूर्वी आईवडलांपासून दूर म्हणून सिरत मोहल्यातील अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट विकत घेतला.

कोल्हापूर : दहशतवाद्यांशी संपर्क असल्याच्या संशयावरून महाराष्ट्रासह देशभरात अनेक ठिकाणी राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) व दहशतवादी विरोधी पथक (एटीएस) ने गुरुवारी मध्यरात्रीपासून छापे टाकले. कोल्हापुरातील सुभाषनगर सिरत मोहल्ला परिसरातील ग्राफिक डिझायनर संशयितांस मध्यरात्री झोपेतूनच ताब्यात घेतले. मौला नबीसाब मुल्ला (वय ३८) असे संशयिताचे नाव आहे. या पथकाने त्यास मुंबईला नेले.पोलिस आणि घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी : दहशतवाद्यांसाठी निधी जमा करणे आणि त्यांच्याशी संपर्क असल्याच्या संशयावरून हे छापे टाकले. सिरत मोहल्ला परिसरात राहणाऱ्या मौला नबीसाब मुल्ला या संशयितास मध्यरात्री तीन वाजता तो राहत असलेल्या अपार्टमेंटमधून ताब्यात घेतले. एक तासाच्या या कारवाईत एन.आय.ए व एटीएसच्या १२ कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. त्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व राजारामपुरी पोलिसांनी बंदोबस्त पुरवला व मदत केली.मुल्ला कुटुंबीय मूळचे कर्नाटकातील आहे. संशयिताचे वडील येथे कामानिमित्त आले आणि ते मणेरमळ्यात स्थायिक झाले. संशयिताने काही वर्षांपूर्वी आईवडलांपासून दूर म्हणून सिरत मोहल्यातील अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट विकत घेतला. तेथे तो पत्नी व दोन मुलांसह राहतो.. तो ग्राफिक्स डिझायनचे काम करून उदरनिर्वाह करीत होता. त्याने अभियांत्रिकाची डिप्लोमाही केला आहे. पीआयएफ या संघटनेचा पदाधिकारी असल्याचा संशय आहे. त्याच माध्यमातून तो सामाजिक काम करीत होता.त्याला एन.आय.ए.ने ताब्यात घेतल्याचे शेजारील नागरिकांनाही माहीत नव्हते. पहाटेच ही कारवाई करीत या पथकाने त्याला मुंबईला नेले. कारवाईची माहिती सर्वत्र कळताच पोलिसांनी या परिसरात बंदोबस्त तैनात केला.संशयितावर यापूर्वीही गुन्हासंशयित मुल्ला यांने डिसेंबर २०२१ मध्ये विक्रमनगर परिसरात धार्मिक तेढ निर्माण होईल, असा आक्षेपार्ह मजकूर असलेला फलक लावला होता. या प्रकरणी त्याला राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. न्यायलयाने दर १५ दिवसांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात हजेरी देण्याची अट घातली. त्यानुसार तो हजेरीसाठी या पोलीस ठाण्यात हजर राहत होता. अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरNIAराष्ट्रीय तपास यंत्रणाtourismपर्यटन