असिफ कुरणेकोल्हापूर : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात पाटील आडनाव असणाऱ्या मतदारांची संख्या ही इतर आडनावांच्या मतदारांपेक्षा जास्त आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात ३ लाख ३९ हजार तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात २ लाख ६३ हजार ५६३ पाटील आडनावाचे मतदार आहेत. त्यानंतर कांबळे आडनावाचे मतदार असून, त्यांची संख्या कोल्हापूर मतदारसंघात १ लाख, तर हातकणंगले मतदारसंघात ८२ हजार ४२१ एवढी आहे. त्यानंतर जाधव आडनावाचे मतदार जास्त आहेत. मतांची ही आकडेवारी पाहता दोन्ही मतदारसंघात पाटलांचीच ताकद जास्त दिसते.
निवडणुकीच्या मतदार याद्यांचे विश्लेषण केल्यानंतर कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात पाटील आडनाव असलेल्या मतदारांचा बोलबाला असल्याचे चित्र आहे. शिरोळ, हातकणंगले, इस्लामपूर वाळवा या मतदारसंघात पाटील आडनावात मराठा व जैन समाजाच्या मतदारांचा समावेश दिसतो. इतर मतदारसंघात मात्र मराठा पाटील यांची संख्या जास्त आहे.कोल्हापूर लोकसभेत राधानगरी भुदरगड व करवीर विधानसभा मतदारसंघात पाटील आडनावाचे मतदार जास्त आहेत. राधानगरी, भुदरगडमध्ये तब्बल ९० ४५२ एवढे म्हणजे २४ टक्के तर करवीरमध्ये ८३ हजार ५८३ (२७.५ टक्के) पाटील मतदार आहेत. या मतदारसंघात निकाल प्रभावित करण्याची ताकद पाटील नावाच्या मतदारांमध्ये आहे. तर, हातकणंगले लोकसभेत शिराळा मतदारसंघात ७०,४४० (२४ टक्के) तर शाहूवाडी मतदारसंघात ६७,९६० (२३ टक्के) पाटील मतदार आहेत.
पाटील याच्यानंतर कांबळे आडनाव असलेल्या मतदारांची संख्या जास्त आहे. राधानगरी मतदारसंघात २७,८८९ तर करवीरमध्ये २५ हजार कांबळे आडनावाचे मतदार आहेत. त्यानंतर जाधव आडनावाचे मतदार आहे. जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघात जाधव, नाईक, सुतार, कुंभार या आडनावांची संख्यादेखील हजारात आहे.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघआडनाव - एकूण मतदारचंदगड विधानसभापाटील - ५३,६४२कांबळे - २०,९७५नाईक - ११,३४७
राधानगरी भुदरगड विधानसभापाटील - ९०,४५२कांबळे - २७,८८९सुतार - ९७९८
कागल विधानसभापाटील - ५५,८४४कांबळे - २१,७५७जाधव - ८३४०
कोल्हापूर दक्षिणपाटील - ३६,६८०कांबळे - १२,७७२जाधव - ८,१८७
कोल्हापूर उत्तरपाटील - १८,८१३जाधव - ८,६८३कांबळे - ७,८१४
करवीर विधानसभापाटील - ८३,५८३कांबळे - २४,९२३जाधव - ७,९०२
हातकणंगले लोकसभा मतदारसंघशाहूवाडी विधानसभापाटील - ६७,९६०कांबळे - १४,३५३जाधव - ९०८०
हातकणंगले विधानसभापाटील - ४०,४३८कांबळे - २००५७जाधव - ८७३४
इचलकरंजी विधानसभापाटील - १५,४१७कांबळे - १०,९७०जाधव - ५,३३६
शिरोळ विधानसभापाटील - २९९३४कांबळे - २०,४८१जाधव - ४०९६
इस्लामपूर वाळवा विधानसभापाटील - ३९,३७४कांबळे - ८,२०३जाधव - ९,८४३
शिराळा विधानसभापाटील - ७०४४०कांबळे - ८३५७जाधव - १२,२३७