शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘एक्झिट पोल’ इतके गोंधळलेले का आहेत? 'हे' यावेत किंवा 'ते' यावेत; पण...
2
Maharashtra Vidhan Sabha: आतापर्यंत कोणत्या पक्षाचा स्ट्राइक रेट राहिला सर्वाधिक?
3
दगाफटका टाळण्यासाठी काँग्रेसकडून खबरदारी, विदर्भातील आमदारांन विशेष विमानाने सुरक्षित ठिकाणी हलवणार
4
निवडणुकीत डिपॉझिट वाचवण्यासाठी उमेदवारांना किती मतांची गरज असते?; जाणून घ्या सविस्तर
5
मणिपुरात आमदाराच्या घरातून दीड कोटीचे दागिने लुटून नेले; जमावाने केली नासधूस
6
यशस्वीचा ऑस्ट्रेलियातील पहिला डाव अयशस्वी! टीम इंडियाचा युवा हिरो स्टार्कसमोर ठरला झिरो (VIDEO)
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कामात यशस्वी व्हाल, आर्थिक लाभ होण्याची शक्यता!
8
Zomato च्या झीरो सॅलरी ऑफरमध्ये नवा टर्न; बॅकफायरनंतर दीपिंदर गोयल यांनी आता काय केल?
9
जगभर : सौदी अरेबियाने १०१ परदेशी नागरिकांना लटकवलं फासावर!
10
याला म्हणतात संस्कार! कैलाश खेर समोर येताच गौरव मोरे पडला पाया, अभिनेत्यावर होतोय कौतुकाचा वर्षाव
11
IND vs AUS : बुमराहच्या नेतृत्वाखाली या दोन नव्या चेहऱ्यांना मिळाली पदार्पणाची संधी
12
‘ती’ वादग्रस्त विधाने आयोगाच्या रडारवर; केंद्रीय मुख्य आयुक्तांनी मागवले अहवाल
13
सत्ता आमचीच! सत्ताधारी महायुती आणि विरोधी मविआच्या नेत्यांचे दावे 
14
करवीर ते कुलाबा 40 टक्के मतांचे अंतर; असे का ते समजून घ्या!
15
टक्क्याचा धक्का कुणाला? निवडणुकीत मतदारांमध्ये सुप्त लाट
16
बीड जिल्ह्यात मतदान केंद्र फोडले; ४० जणांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल
17
दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानमध्ये ५० ठार; मृतांमध्ये आठ महिला, पाच लहान मुलांचा समावेश
18
Maharashtra Vidhan Sabha ELection 2024: मुंबईत कोणत्या शिवसेनेसाठी मतटक्का वाढला?
19
विशेष लेख: कट्टर उजवे आणि वादग्रस्त - ऑल द प्रेसिडेंट्स मेन....
20
अदानींवर अमेरिकेत लाचप्रकरणी खटला; आरोप निराधार, आम्ही निर्दोष : अदानी

निवडणुकांत भाऊ माझा पाठीराखा, कोल्हापूर जिल्ह्यात सतेज पाटील, प्रकाश आबिटकरांसह 'या' नेत्यांना बंधूंचे पाठबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 5:11 PM

पोपट पवार  कोल्हापूर : एकीकडे भारतातील आदर्श कुटुंबव्यवस्थेची वीण पूर्णपणे सैल होऊ लागली असताना दुसरीकडे राजकारणातील काही घराण्यांनी मात्र ...

पोपट पवार कोल्हापूर : एकीकडे भारतातील आदर्श कुटुंबव्यवस्थेची वीण पूर्णपणे सैल होऊ लागली असताना दुसरीकडे राजकारणातील काही घराण्यांनी मात्र ही वीण अधिक घट्ट बांधत कुटुंबातील एकाच व्यक्तीच्या पाठीशी आपली ताकद उभी केली आहे. माझ्यापेक्षा तू कसा मोठा होतो म्हणत रक्ताची नाती एकमेकांना पाण्यात पाहत असताना जिल्ह्यातील काही भावांनी मात्र आपल्या दुसऱ्या भावासाठीच आपली ताकद खर्ची घातली आहे.आमदार सतेज पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यासह काही नेत्यांचे राजकारण त्यांच्या बंधूंच्या भक्कम पाठबळावर उभे आहे. पडद्यामागून सुत्रे हलवणारे हे बंधूच या नेत्यांसाठी सर्वात मोठा आधार ठरत आहेत.

संजय पाटील-सतेज पाटील बंधुप्रेमकाँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते सतेज पाटील यांच्या राजकारणाला त्यांचे मोठे बंधू डॉ. संजय डी. पाटील यांचे सर्वात मोठे पाठबळ आहे. राजकारणाच्या कोणत्याही आखाड्यात संजय पाटील येत नसले तरी पडद्यामागून सर्व जोडण्या लावण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरते. सध्या सतेज पाटील हे राज्यस्तरावरील नेतृत्व म्हणून पुढे आले आहे. त्यांच्या करवीर विधानसभा मतदारसंघाच्या राजकीय करिअरपासून ते काँग्रेसचे राज्यातील आश्वासक नेतृत्व इथंपर्यंतच्या प्रवासात संजय पाटील त्यांच्या पाठीशी पहाडासारखे उभे राहिले आहेत.

आबिटकर बंधूंची एकीराधानगरी मतदारसंघातून सलग दोनवेळा गुलाल घेतलेले प्रकाश आबिटकर यांच्या राजकारणाला त्यांचे बंधू अर्जुन आबिटकर यांनी खऱ्या अर्थाने बुस्टर दिला आहे. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य असलेले अर्जुन आबिटकर हे मतदारसंघातील नागरिकांना भेटण्यापासून त्यांच्या स्थानिक समस्या सोडवण्यापर्यंत पुढाकार घेत असतात. विजयासाठीच्या पडद्यामागील जोडण्याही तेच लावतात.

यड्रावकर बंधूचे प्रेमशिरोळ मतदारसंघातून महायुतीकडून रिंगणात उभे असलेले आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचे राजकारण त्यांचे लहान बंधू संजय यांच्यावर तरले आहे. जयसिंगपूर नगरपालिका, शेतकरी सूतगिरणी यासह तालुक्यातील यड्रावकर गटाच्या राजकारणाची भिस्त संजय यांच्यावरच आहे. राज्यमंत्रिपदही त्यांनीच खेचून आणले आहे. संजय म्हणजे माझा 'लक्ष्मण' आहे असे राजेंद्र पाटील अभिमानाने सांगत असतात.

नरके यांना बंधूंची साथकरवीरच्या राजकारणात चंद्रदीप नरके यांना त्यांचे बंधू अजित नरके हे सावलीसारखे साथ देत आहेत. गावगाड्यातील स्थानिक कार्यकर्त्यांशी अजित नरके यांचा चांगला संपर्क आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kolhapur-south-acकोल्हापूर दक्षिणkolhapur-north-acकोल्हापूर उत्तरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलPrakash abitkarप्रकाश आबिटकरPoliticsराजकारणwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024