कोल्हापूर: राष्ट्रपती द्रौपद्री मुर्मू या सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात कोल्हापूर दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. महापुराच्या स्थितीमुळे त्यांचा २८ जुलैचा दौरा स्थगित करण्यात आला होता. ४ सप्टेंबर ही तारीख निश्चित होण्याची दाट शक्यता आहे.कोल्हापूर येथे अंबाबाई दर्शन आणि वारणानगर येथील वारणा भगिनी मंडळाच्या कार्यक्रमाला त्या उपस्थित राहणार होत्या. परंतु जिल्ह्यात महापुराची स्थिती निर्माण झाल्याच्या जिल्हा प्रशासनाच्या अहवालानंतर हा दौरा स्थगित करण्यात आला होता. तो आता सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. त्यांच्या दौऱ्याचे प्रशासकीय कागदोपत्री नियोजन पूर्ण झाले असून त्यांची फक्त आता अंमलबजावणी करावी लागणार आहे.
राष्ट्रपती सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात कोल्हापूर दौऱ्यावर येण्याची शक्यता, महापुरामुळे केला होता दौरा स्थगित
By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2024 3:25 PM