शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

मशागतीसाठी शेतकऱ्यांची धावाधाव; रोटर, बैलांच्या औतालाही वेटिंग 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 3:55 PM

मान्सून उंबरड्यावर आल्याने शेतकऱ्यांची खरीप पेरणी तयारीची लगबग

कोल्हापूर : मान्सून उंबरड्यावर आल्याने शेतकऱ्यांची खरीप पेरणी तयारीची लगबग वाढली आहे. मशागतीची कामे एकदम सुरू झाल्याने ग्रामीण भागात रोटर, बैलांचे औतासाठी वेटिंगवर थांबावे लागत आहे. बैलांची संख्या फारच कमी झाल्याने छोट्या, मोठ्या रोटरना खूपच मागणी वाढली आहे. रोटरच्या त्याच्या मालकावर अवलंबून असल्याने प्रत्येक गावात वेगवेगळे दर पाहावयास मिळतात. बैलांचे औत काहीसे महागले आहे.यंदा मान्सून अंदमान निकोबारमध्ये वेळेवर दाखल झाला असून तो गतीने पुढे सरकत आहे. साधारणत: जूनच्या पहिल्या आठवड्यात तो तळकोकणातून कोल्हापुरात दाखल होईल, असा अंदाज आहे. त्यात गेल्या आठ-दहा दिवसांपासून पावसाचे वातावरण राहिल्याने शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे. उन्हाळी पिके काढून खरिपासाठी जमिनी तयार करण्यासाठी घाई सुरू झाली आहे. बांध धरणे, नांगरट करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे; पण मशागतीसाठी बैलांचे औत, रोटर वेळेत मिळेनात.बैलांची संख्या कमी झाल्याने गावात एक-दोनच बैलांची औत असते. त्यालाही खूप मागणी आहे, त्यामुळे आठवडाभर नंबर लावून ठेवावे लागत आहे. त्यातही गडबडीत जमीन तयार करून पेरणी करायची झाल्यास लहान रोटरचा वापर चांगला होतो; पण तेही वेळेत मिळत नाही. शेतकऱ्याला सकाळी लवकर रोटर चालकाच्या दारात जाऊन बसावे लागत असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे.बैलांची संख्या कमी होऊ लागली तसे औतांचे दरही वाढू लागले आहेत. सध्या काही गावांत प्रति दिन १२०० ते १३०० रुपये दर आहे. रोटरचे दर कामानुसार ठरलेले आहेत, तरीही गेल्या वर्षीच्या तुलनेत बैलांच्या औतांच्या दरात वाढ झाली असून रोटरचे दर प्रत्येक गावातील मागणीनुसार आकारले जात आहेत.

शिवारं फुलली..खरीप तयारीसाठी शिवारं अरक्षश: फुलून गेली आहेत. सकाळी लवकर शेतकरी कुटुंबातील सगळीच शिवारात दाखल झालेली असतात. दिवसभर झटून काम पूर्ण करण्याचा प्रयत्न असतो.

असे आहेत मशागतीचे दर

  • बैल औत - प्रति दिन १२०० रुपये
  • रोटरने नांगरट - प्रति गुंठा १५० रुपये
  • उसाची भरणी - प्रति गुंठा १३० रुपये
  • नांगरट करून सरी सोडणे - प्रति गुंठा २५० रुपये

रोटरच्या मशागतीच्या दरात फारशी वाढ झालेली नाही; पण एकूणच कष्ट व जोखमीचे काम पाहता दर कमीच आहेत. एकदमच सगळ्यांची कामे सुरू झाल्याने कोणाकडे जायचे, असा प्रश्न तयार होतो. - सरदार खाडे (रोटर चालक)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरी