कोल्हापूर: विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी तीन वाजता एमपीएससीच्या पीएसआय मुख्य परीक्षा २०२२ मध्ये रेशो वाढ संबंधित उच्चस्तरीय बैठक होणार आहे.या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यातर्फे अवर सचिव तसेच उपमुख्यमंत्री यांचे सचिव त्याचबरोबर एमपीएससीचे अध्यक्ष आणि सचिव त्याचबरोबर २२ आमदार निमंत्रित अतिथी आहेत. बैठकित आमदार मनीषा कायंदे यांच्या लक्षवेधी क्रमांक ५०२ मधील विषय (पीएसआय २०२२ मुख्य परीक्षेसाठी एका पदासाठी १६.६४ ऐवजी वीस पट प्रमाण घेण्याच्या) संदर्भातही चर्चा होणार आहे.शेकडो उमेदवारांच्या या प्रश्नासंदर्भात आमदार डॉ. मनिषा कायंदे यांनी विधान परिषदेत ५०२ क्रमांकाने २८ जुलै रोजी लक्षवेधी सूचना मांडली होती. या विषयावर चर्चा करण्यासाठी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज, बुधवारी दुपारी तीन वाजता विधानभवनात कक्ष क्रमांक १४५ येथे विधान परिषदेतील आमदारांची बैठक बोलावली आहे. बैठकीला डॉ. गोऱ्हे यांच्या कार्यालयाने काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांच्यासह विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, प्रवीण दरेकर, सचिन अहिर, जयंत पाटील, शशिकांत शिंदे, कपिल पाटील, भाई जगताप, अभिजित वंजारी विक्रम काळे, किरण सरनाईक, गोपीचंद पडळकर, सत्यजित तांबे यांना निमंत्रित केले आहे. या बैठकीसाठी मंत्रालयाच्या सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव (सेवा), महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सचिवांनाही उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
विधिमंडळ बैठकीत आज एमपीएससीच्या रेशोवरही चर्चा
By संदीप आडनाईक | Published: August 02, 2023 1:16 PM