शहरं
Join us  
Trending Stories
1
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
2
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
3
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
4
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
5
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
6
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
7
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
8
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
9
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
10
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
11
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
12
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
13
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
14
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
15
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
16
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
17
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
18
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
19
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
20
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात

पीक विमा काढण्यात कोल्हापुरातील शेतकऱ्यांचा प्रतिसाद कमीच, केवळ २३ हजार संरक्षित क्षेत्र  

By राजाराम लोंढे | Published: August 08, 2024 4:24 PM

बिगर कर्जदारांचाच सहभाग अधिक

राजाराम लोंढेकोल्हापूर : केंद्र व राज्य सरकारच्या वतीने प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील ३३ हजार ७७२ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत २२ हजार शेतकरी कमी झाले आहेत. खरिपाच्या १ लाख ९२ हजार ६३३ हेक्टरपैकी केवळ २३ हजार ११७ हेक्टरच क्षेत्र विमा संरक्षित झाले आहे.अतिवृष्टी, महापूर, राेगराई या कारणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. यासाठी, केंद्र व राज्य सरकारने खरीप व रब्बी हंगामातील पिकांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू केली आहे. गेल्या वर्षीपासून अवघ्या १ रुपये हप्ता भरून विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन सरकारने केले होते. विमा कंपन्यांना राज्य व केंद्र सरकार विमा हप्त्याची रक्कम देते.खरीप हंगाम २०२३-२४ मध्ये जिल्ह्यातील ५५ हजार शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभाग घेतला होता. मात्र, यंदा २०२४-२५ मध्ये दोन वेळा मुदत वाढ देऊनही ३३ हजार ७७२ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे.बिगर कर्जदारांचाच सहभाग अधिकराष्ट्रीयकृत बँका किंवा विकास संस्थांच्या माध्यमातून पीक कर्ज उचल केलेल्या शेतकऱ्यांचा पीक विम्यातील सहभाग खूपच कमी आहे. केवळ ९१० शेतकऱ्यांनी सहभाग घेतला असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांची संख्या तुलनेत अधिक आहे.

यासाठी मिळते नुकसान भरपाई..

  • शेतात पाणी साठून पीक खराब होणे.
  • महापूर, पूर, अतिवृष्टीने पिके वाहून जाणे किंवा कुजणे
  • पीक काढणीपर्यंत आपत्ती, वादळ, अवकाळी पावसामुळे होणारे नुकसान
  • नैसर्गिक आपत्ती, कीटक आणि रोगराईचा फटका

भाताला काढणी पश्चातच भरपाईमहापूर, अतिवृष्टीने नुकसान झाले असेल तर ७२ तासात संबधित विमा कंपनीस कळविणे बंधनकारक आहे. त्यानंतर कंपनीच्या वतीने पंचनामा करून भरपाईस पात्र ठरवले जाते. विमा योजनेत संरक्षित पिकांपैकी केवळ भाताला काढणी पश्चात नुकसान भरपाई मिळते.

तालुकानिहाय विमा याेजनेत सहभागी शेतकरी व क्षेत्र हेक्टर मध्येतालुका  -  शेतकरी -  क्षेत्रआजरा  -  १७६०  - १८७५            गगनबावडा - ६८३  - ४६८भुदरगड - ९३७  -  ७९७चंदगड  - ५०४०  - ४५०१गडहिंग्लज - ४१३४  -  २९९६हातकणंगले - ५६६३ - ३७०५कागल  -  २१६३ - १३०८करवीर  - ३३९४  - १६१५पन्हाळा - १६५४  -  ७७६राधानगरी - ३३०७  -  १७१५शाहूवाडी  - १३७६  -  ९०६शिरोळ  - ३६६१ - २४४९

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र