शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

भाड्यावरून वाद; घाई-गडबडीत निघालेल्या रिक्षाचालकाने महिलेस शंभर फूट फरफटत नेले, कोल्हापुरातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2023 2:23 PM

मारहाण होईल या भीतीने त्याने रिक्षा थांबवली नाही

कोल्हापूर : रिक्षाच्या भाड्यावरून झालेल्या वादानंतर घाई-गडबडीत निघालेल्या रिक्षाच्या गार्डमध्ये साडी अडकल्याने रिक्षाचालकाने महिलेस सुमारे शंभर मीटर फरफटत नेले. गुरुवारी (दि. ६) दुपारी दीडच्या सुमारास सायबर चौक ते माउली पुतळा मार्गावर झालेल्या घटनेत मीना धनपाल साठे (वय ६२, रा. पंत मंदिराजवळ, राजारामपुरी, १४ वी गल्ली, कोल्हापूर) या जखमी झाल्या. याबाबत रिक्षाचालक सज्जाद अमिद मोमीन याच्यावर राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.फिर्यादी किरण धनपाल साठे (वय ४५, रा. राजारामपुरी, १४ वी गल्ली) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या आई मीना या गुरुवारी दुपारी रिक्षाने घरी आल्या. रिक्षाच्या भाड्यावरून त्यांचा रिक्षाचालकाशी किरकोळ वाद झाला. त्यावेळी परिसरातील नागरिकांची गर्दी जमल्याने घाबरलेल्या रिक्षाचालकाने घाई-गडबडीत तिथून निघून जाण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी पाठीमागे रिक्षाला टेकून उभ्या असलेल्या मीना साठे यांच्या साडीचा पदर रिक्षाच्या गार्डमध्ये अडकल्याने रिक्षाने त्यांना फरफटत नेले. हा प्रकार पाहून रस्त्यावरील लोक रिक्षाचालकाला थांबवण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, मारहाण होईल या भीतीने त्याने रिक्षा थांबवली नाही. अखेर महिला रिक्षासोबत फरफटत असल्याचे लक्षात येताच त्याने रिक्षा थांबवली. जखमी महिलेवर सीपीआरमध्ये उपचार करण्यात आले. किरण साठे यांच्या फिर्यादीनुसार राजारामपुरी पोलिसांनी रिक्षाचालक मोमीन याच्यावर गुन्हा दाखल केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस