शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

आताच वाढू शकतो साखरेचा विक्री दर; राज्य साखर महासंघाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2023 9:02 AM

वाढलेल्या एफआरपीमुळे साखर कारखाने अडचणीत येणार आहेत.

- चंद्रकांत कित्तुरेकोल्हापूर :  वाढलेल्या एफआरपीमुळे साखर कारखाने अडचणीत येणार आहेत. तसेच बाजारातील साखरेचा दरही प्रतिक्विंटल ३४०० रुपयांच्या पुढे आहे. त्यामुळे साखरेचा किमान विक्री दर वाढविण्याची हीच योग्य वेळ आहे. केंद्र सरकारने  तो  ३,७५० रुपये प्रतिक्विंटल करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना महासंघाने केली आहे. 

गेल्या सहा वर्षांत उसाची एफआरपी पाच वेळा वाढविण्यात आली आहे. ती २,५५० वरून ३,१५० रुपये प्रतिटन झाली आहे. साखरेच्या किमान विक्रीदरात मात्र एकदाच वाढ होऊन तो २९०० वरून ३१०० रुपये प्रतिक्विंटल करण्यात आला आहे. केंद्र सरकारने एफआरपीत प्रतिटन शंभर रुपयांची वाढ गेल्या आठवड्यातच केली आहे. याचवेळी साखरेचा विक्री दर वाढविणेही अपेक्षित होते. मात्र, तो वाढला नसल्याने ही मागणी करीत असल्याचे महासंघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील आणि व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ यांनी म्हटले आहे. 

दरवाढ का हवी ?कृषी मूल्य आयोगाने एफआरपीतील वाढीबरोबरच साखरेच्या किमान विक्रीदरातही वाढ करण्याची शिफारस केलेली आहे. साखर किंमत नियंत्रण आदेश १९१८ तील कलम ४ मध्येही एफआरपीव्यतिरिक्त प्रक्रिया खर्च, वित्तीय खर्च यामध्ये दरवर्षी होणाऱ्या बदलाचा आढावा घेऊन साखरेचा किमान विक्रीदर निश्चित केला जाईल, असे म्हटले आहे. मात्र केंद्र शासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे.

मार्जिन मनीसहकारी बँका साखरेच्या मूल्यांकनाच्या आधारे कारखान्यांना कर्ज देत असतात. सध्याच्या दराप्रमाणे मिळणाऱ्या कर्जातून १० टक्के मार्जिन मनी धरल्यास प्रतिटन  १,११० रुपये, तर १५ टक्के मार्जिन मनी धरल्यास १,२३५ रुपये कमी पडतात.  यामुळेच साखरेचा विक्रीदर वाढविण्याची गरज आहे. अन्यथा कारखाने आर्थिकदृष्ट्या डबघाईस येतील.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने