शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

कोल्हापुरात पहिल्यांदाच फुलले पळस कुळातील 'पायमोज्याचे झाड'

By संदीप आडनाईक | Published: January 08, 2024 12:55 PM

कोल्हापूर : सीपीआर रुग्णालयासमोरील टाऊन हॉल उद्यानात शहरात एकमेव असलेला पळस कुळातील पायमोज्याचा वृक्ष यावर्षी प्रथमच बहरला आहे. यापूर्वी ...

कोल्हापूर : सीपीआर रुग्णालयासमोरील टाऊन हॉल उद्यानात शहरात एकमेव असलेला पळस कुळातील पायमोज्याचा वृक्ष यावर्षी प्रथमच बहरला आहे. यापूर्वी या वृक्षाला कधीही फुले आली नसल्याने त्याची शास्त्रीयदृष्ट्या पुष्टी झाली नव्हती. यंदा या झाडाला फुले आल्याने वनस्पती तज्ञ डॉ. मकरंद ऐतवडे यांनी अभ्यासाअंती याची रीतसर पुष्टी केली आहे. या वृक्षाची कोल्हापूर जिल्ह्याच्या वनस्पती कोशामध्येही नोंद नव्हती, त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यासाठी या वृक्षाची प्रथमच नोंद होत आहे.टाऊन हॉल उद्यानात विविध प्रजातींचे ९४ प्रकारचे वृक्ष पाहायला मिळतात. येथील हे पायमोज्याचे वृक्ष बहरल्याचे निसर्गप्रेमी धनश्री भगत आणि परितोष उरकुडे यांच्या लक्षात आले. त्यांनी या फुलांची छायाचित्रे डॉ. ऐतवडे यांना पाठविले. त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन या झाडाचीच ही फुले फुलल्याचे स्पष्ट केले. पळस कुळातील हा वृक्ष मुळचा लॅटिन अमेरिकेतील पेरु या देशातील असून व्हेनिझुएला, ब्राझील, साल्वाडोर या देशांतील जंगलामध्ये १०० फुटांपेक्षाही जास्त उंच वाढतो. याचे शास्त्रीय नाव मायरोझायलॉन बालस्यामम आहे. याला पेरु, बाल्सम, टोलू बाल्सम अशी इंग्रजी नावे आहेत. दक्षिण अमेरिकेतील काही देशांमध्ये 'सँनटोस् महोगनी' अशीही या वृक्षाची ओळख आहे.पायमोज्याचे झाड म्हणून ओळखयाच्या शेंगा पायमोज्याच्या आकाराच्या असल्याने यास ‘पायमोज्याचे झाड’ म्हणतात. शेंग हेलिकॉप्टरसारखी गरगरत येऊन जमिनीवर पडते. हा वृक्ष मुंबई, बेंगलोर येथील लालबाग उद्यान, निलगिरी हिल्समधील कलगार उद्यान आणि दक्षिण भारतातील काही उंच भागांमध्ये आढळतो. हा वृक्ष सदाहरित आहे. खोडामध्ये रेझीन असून त्यास तुळशीच्या पानांसारखा वास येतो. पाने संयुक्त आणि एकआड एक असतात. फुलोरे पानांच्या बेचक्यात येतात. फुले लहान आणि पिवळसर पांढऱ्या रंगाची असतात. याची एक पाकळी मोठी असून उर्वरित चार नाजूक व लहान असतात. फळ शेंगाधारी असून पंखधारी शेंगांच्या टोकाला एकच बी असते.

“जिल्ह्यात अनेक वृक्ष नव्याने नोंद होत आहेत. यातील बहुसंख्य विदेशी आणि दुर्मिळ आहेत. अशा वृक्षांना वारसा वृक्षांचा दर्जा दिला गेला पाहिजे. यामुळे या दुर्मिळ वृक्ष संपदेचे जतन आणि संवर्धन होईल.” - डॉ. मकरंद मोहनराव ऐतवडे

टॅग्स :kolhapurकोल्हापूर