कोल्हापूर : पहाटे धुकं, दुपारी कडकडीत ऊन आणि रात्री अंगात हुडहुडी भरवणारी थंडी असे वातावरण शहर आणि जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून आहे. पुढील पाच ते सहा दिवस रात्रीच्यावेळी २० डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान खाली येणार आहेत. परिणामी हिवाळा, उन्हाळाच्या वातावरणाची अनुभूती येत आहे.परतीचा पाऊस सुरू झाला आहे. पण अजूनही पावसाळा आहे. दोन, तीन दिवसांतूून पावसाच्या सरी कोसळत आहेत. मात्र पाच ते सहा दिवसांपासून रात्री आणि पहाटे गारवा आहे. अंगाला झोंबणारी थंडी वाजत आहे. यामुळे रात्री, पहाटे बाहेर पडताना उबदार कपडे परिधान करावे लागत आहे. ऐन हिवाळ्याची अनुभूती पावसाळ्यातच येत आहे. पण दुपारी बारा ते सायंकाळी चारपर्यंत उन्हाचे चटकेही बसत आहेत.दिवसभर २८ ते २९ डिग्री सेल्सिअस असे वातावरण राहत आहे. गुरुवारी दिवसभर २६ डिग्री सेल्सिअस असे वातावरण राहिले. रात्री २० डिग्री सेल्सिअस राहिले. हिवाळ्यात जितके तापमान खाली येेते तितके आताच रात्रीच्यावेळी येत आहेत. परिणामी बाजारपेठेत उबदार कपड्यांना मागणी वाढल्याचे विक्रेत सांगतात.
२६ सप्टेंबरपर्यंत दिवसा आणि रात्रीचे तापमान डिग्री से.मध्ये असे ..२० : २८ - २१२१ : २९ - २१२२ : २८ - २२२३ : २७ - २२२४ : २९ - २२२५ : २८ - २१२६ : २९ - २०